देवदत्त पडिक्कल (Photo Credit: PTI)

India Tour of Sri Lanka 2021: जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यासाठी (Sri Lanka Tour) भारतीय संघाची (Indian Team) घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी फलंदाज शिखर धवन पुन्हा एकदा यजमान श्रीलंकेविरुद्ध आगामी द्विपक्षीय मालिकेत टीम इंडियाकडून (Team India) पुन्हा व्हाईट बॉलमध्ये परतणार असेल तर यंदा त्याच्याकडे फलंदाजीसोबत नेतृत्वाची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) हंगाम 14 आणि आगामी आयसीसी वर्ल्ड टी-20 सामन्यापूर्वी धवनच्या नेतृत्वात भारतीय संघ (Indian Team) एक दोन व्हाईट-बॉल मालिका खेळेल. गुरुवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या पुढील व्हाईट बॉल मालिकेसाठी अंतिम संघ जाहीर केला. बीसीसीआयने (BCCI) दुसर्‍या टप्प्यातील संघात भारतातील सर्वाधिक जागतिक दर्जाचे बेंच खेळाडूंची निवड केली आहे. विशेष म्हणजे बोर्डाने आयपीएल (IPL) 2021 च्या पहिल्या टप्प्यातील काही स्टार युवा खेळाडूंचा समावेश केला आहे ज्यांची कामगिरी खालीलप्रमाणे आहे. (Ind vs SL: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; शिखर धवनला मिळाले कर्णधारपद)

1) देवदत्त पडिक्क्ल (Devdutt Padikkal)

आयपीएलमध्ये कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी देवदत्त तारणहार ठरला आहे.  गेल्या वर्षी आरसीबीकडून पदार्पणाच्या पहिल्या मोसमानंतर पडिक्क्लने आयपीएल 2021 मध्ये शानदार सुरुवात करण्यापूर्वी घरगुती क्रिकेटमध्ये पुनरागमन करत धावा लुटल्या. यंदाच्या आयपीएल मोसमात पडिक्क्लने पहिले शतक ठोकले आणि आरसीबीसाठी 6 सामन्यात 195 धावा केल्या.

2) चेतन सकारिया (Chetan Sakaria)

आयपीएलच्या पहिल्या सत्रात युवा चेतनने राजस्थान रॉयल्स संघासाझठी नियमित अंतराने विकेट घेण्याची प्रतिभा दाखवून आपली उपस्थिती जाणवून दिली. श्रीलंकेत युवा वेगवान गोलंदाजांकडून भारतीय संघाला अशीच अपेक्षा असेल कारण त्याने सर्वांना प्रभावित चांगले केले आहे. हा युवा वेगवान गोलंदाज लीगमधील राजस्थान रॉयल्स संघासाठी महत्त्वपूर्ण डेथ गोलंदाज ठरला आहे.

3) नितीश राणा (Nitish Rana)

देशांतर्गत क्रिकेटचा विचार केला तर नितीश राणाने सर्वांच्या अपेक्षांनुसार कामगिरी केली आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघातील 6 अनकॅप्ड खेळाडूंपैकी राणाला अधिक परिचयाचा आहे. टी-20 आणि वनडे मालिकेसाठी टीम इंडियात राणाची केकेआर संघाचा सहकारी वरुण चक्रवर्ती सोबत निवड झाली आहे. केकेआरसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या राणाने 7 सामन्यांत 201 रन्स काढल्या आहेत.

4) रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)

गायकवाडकडे प्रवाही फलंदाजीचे तंत्र असून 24 वर्षीय फलंदाजाकडून श्रीलंका दौऱ्यावरील मालिकेमध्ये आपली शानदार फलंदाजी दर्शवण्याची अपेक्षित आहे. गायकवाड हा एक आदर्श सलामीचा उमेदवार असून चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजास आगामी व्हाईट बॉल मालिकेमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.

5) कृष्णाप्पा गौथम (Krishnappa Gowtham)

आयपीएल 2021 च्या चेन्नई सुपर किंग्जच्या (सीएसके) पुनरुत्थानामध्ये कृष्णाप्पा गौतमची कोणतीही भूमिका बजावली नसली तरी, 32 वर्षीय अष्टपैलूला श्रीलंका दौर्‍यासाठी टीम इंडियाच्या योजनांमध्ये उतरण्याची संधी आहे. गौतमला चेन्नईने 9.25 कोटी रुपयात संघात सामील केले. पुढच्या महिन्यात फिरकीपटूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटची संधी मिळाली तर गौथम प्रेमदासा खेळपट्टीवर सर्वाधिक प्रभावी ठरेल अशी अपेक्षा आहे.