IND vs SA 1st Test Day 1 Highlights: यजमान दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि भारत (India) यांच्यात आजपासून सेंच्युरियन (Centurion) येथे मालिकेच्या सलामीच्या सामन्याचा पहिला दिवस भारतीय फलंदाजांच्या नावे राहिला. दिवसाच्या पहिल्या सत्र अखेरीस भारताने तीन विकेट गमावून 272 धावा केल्या आहेत. सलामीवीर केएल राहुलने (KL Rahul) दणदणीत शतक झळकावले तर मयंक अग्रवालने 60 धावांची अर्धशतकी खेळी केली. राहुल 122 धावा तर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 40 धावा करून परतले. पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला आणि यजमान गोलंदाजांवर एकहाती वर्चस्व गाजवले. डीन एल्गारच्या दक्षिण आफ्रिकी संघाकडून पहिल्या दिवशी फक्त लुंगी एनगिडीने (Lungi Ngidi) पाहुण्या संघाच्या तीनही विकेट घेतल्या. या बॉक्सिंग-डे कसोटीत (Boxing Day Test) विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. (IND vs SA 1st Test: लुंगीने वाजवली पुजाराची पुंगी! Cheteshwar Pujara याला दोनदा गोल्डन डकवर बाद करणारा दक्षिण आफ्रिकी एकमेव खेळाडू)
भारताकडून मयंक आणि राहुलच्या सलामी जोडीने टीमला शानदार सुरुवात करून दिली. राहुल आणि मयंकमध्ये पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी झाली. दोघे यजमान गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असताना लुंगी एनगिडीने मयंकला 60 धावांवर बाद करून संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. त्यानंतर पुढील चेंडूवर एनगिडीने अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता शून्यावर पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर राहुलने कर्णधार विराट कोहलीसह अर्धशतकी भागीदारी करून संघाला डाव सावरला. दोघांमध्ये 82 धावांची भागीदारी एनगिडीने मोडली आणि विराटला 35 धावांवर तंबूत धाडले. कोहलीला एनगिडीने विआन मुल्डरच्या हाती झेलबाद केले. कोहली सामन्यात चांगली फलंदाजी करत असल्याने पुन्हा एकदा त्याची मोठी खेळीची संधी हुकली. विराटनंतर राहुलने माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला साथीला घेत दिवसाचा खेळ संपेपर्यंत कोणताही झटका बसू दिला नाही. यादरम्यान राहुलने 218 चेंडूत सातवे कसोटी शतक झळकावले. राहुल आणि रहाणेमध्ये आतापर्यंत 131 चेंडूत 73 धावांची भागीदारी झाली आहे.
💯
A phenomenal century by @klrahul11 here at the SuperSport Park.
This is his 7th Test ton 👏👏#SAvIND pic.twitter.com/mQ4Rfnd8UX
— BCCI (@BCCI) December 26, 2021
दुसरीकडे, नाणेफेक दरम्यान कोहलीने सांगितले की भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज, एक फिरकी गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडूच्या संयोजनासह खेळणार आहे. भारताने जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी यांची निवड केली आहे, तर आर अश्विन फिरकीपटू असेल आणि शार्दुल ठाकूर अष्टपैलूच्या भूमिकेत संघाची ताकद वाढवेल.