Mithali Raj World Cup Record: भारतीय महिला संघाची (India Women's Team) कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने ICC महिला विश्वचषक 2022 पहिल्या साखळी सामन्यात पाकिस्तान महिला संघाविरुद्ध (Pakistan Women's Team) मैदानात उतरताच इतिहास रचला. मिताली राज आता सर्वाधिक आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धा खेळणारी जगातील पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे. मात्र, आपल्या विक्रमी सामन्यात मिताली 36 चेंडूत केवळ सहा धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतली. रविवारी मैदाना पाऊल ठेवताच राजने रविवारी माऊंट मौनगानुई येथील बे ओव्हल येथे पाकिस्तानविरुद्ध महिला विश्वचषकच्या सलामीच्या सामन्यात अविश्वसनीय कामगिरी केली, तसेच भारतीय दिग्गज पुरुष फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Pakistan) विक्रमाची बरोबरी केली. मितालीने 2002 मध्ये पहिला विश्वचषक पदार्पण केल्यापासून 2005, 2009, 2013, 2017 आणि आता 2022 विश्वचषक स्पर्धेत खेळली आहे. (IND-W vs PAK-W World Cup 2022: पाकिस्तानी महिला कर्णधाराने जिंकली मने, भारताविरुद्ध हाय वोल्टेज सामन्यापूर्वी प्रत्येक खेळाडूसाठी बनली प्रेरणा)
मितालीने न्यूझीलंडची माजी क्रिकेटपटू डेबी हॉकली आणि इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्स यांना मागे टाकले आहे. दरम्यान मितालीची सहकारी झुलन गोस्वामी पाच विश्वचषक स्पर्धासह यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. लक्षात घ्यायचे की 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 असे सहा पुरुष एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणारा सचिन हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. एकूणच तीन क्रिकेटपटूंनी ही अप्रतिम कामगिरी केली आहे आणि पाकिस्तानचा महान जावेद मियांदाद दुसरा खेळाडू आहे. 39 वर्षीय मिताली राजच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर तिने आतापर्यंत भारतासाठी 226 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने 51.56 च्या सरासरीने 7632 धावा केल्या आहेत ज्यात 7 शतकांचा समावेश आहे. मिताली राजची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 125 आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सात हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली ही पहिली महिला खेळाडू आहे.
दुसरीकडे, सामन्याबद्दल बोलायचे तर विश्वचषकच्या पहिल्या चुरशीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण कर्णधार मितालीचा निर्णय उलटला कारण संघाने अवघ्या 114 धावांत सहा विकेट गमावल्या. मितालीला वाटले की ही एक चांगली फलंदाजी विकेट आहे आणि तिला वाटले की संघ खूप मोठी धावसंख्या उभारू शकते. पण स्मृती मंधाना हिला वगळता भारताचे आघाडीचे खेळाडू पाकिस्तानच्या भेदक माऱ्यापुढे ढेपाळले.