IND vs PAK, U-19 Asia Cup: अर्जुन-टिळकची शतकी खेळी; भारतीय गोलंदाजांसमोर पाक फलंदाज Fail, पाकिस्तान 60 धावांनी पराभूत
(Photo Credit: @DDNational)

श्रीलंकेत (Sri Lanka) आयोजित अंडर-19 आशिया चषक गटातील सामन्यात शनिवारी भारताने (India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (Pakistan) 60 धावांनी पराभूत करून स्पर्धेतील सलग दुसरा विजय नोंदविला. या विजयासह भारताने आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे.  दोन देशांमधील राजकीय तणावा दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 306 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पण, हे आव्हान पाकिस्तानी फलंदाजांना पेलता आले नाही आणि 46.4 ओव्हरमध्ये 254 धावा करत संपूर्ण संघ बाद झाला. भारताच्या विजयात अर्जुन आझाद (Arjun Azad) आणि टिळक वर्मा (Tilak Varma) यांच्या शतकी खेळीने महत्वाची भूमिका बजावली. अर्जुनने 111 चेंडूंत 121 धावा केल्या तर नंबुरीने 119 चेंडूत 110 धावांची खेळी केली.

भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानकडून कर्णधार रोहेल नजीर (Rohail Nazir) याने 105 चेंडूत 117 धावांची डाव खेळत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला परंतु दुसर्‍या टोकाला हरीस खान (Haris Khan) याच्याखेरीज कोणताही फलंदाज टिकू शकला नाही.  हॅरिसने 43 धावा केल्या. भारताकडून अथर्व अंकोलेकर (Atharva Ankolekar) याने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याने विजयाच्या दिशेने वाटचाल करत पाकिस्तानची तीन त्वरित विकेट्स घेत सामना बदलून टाकला. विजयासाठी 306 धावांचा पाठलाग करत असलेल्या पाकिस्तानला सलामीवीर फलंदाज हैदर अली खान (Haider Ali Khan) याच्या रूपात पहिला धक्का बसला. त्याला विद्याधरने चेंडूवर यष्टीरक्षकाकडे झेलबाद केले. यानंतर विद्याधर पाटील याने (Vidyadhar Patil) आणखी एक सलामीवीर अब्दुल बंगालझाई (Abdul Bangalzai) याला आपला दुसरा बळी बनवला.

अवघ्या 53 धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानने तिसरा विकेट गमावला. फहाद मुनीर याला सुशांत मिश्रा (Sushant Mishra) याने 1 धावांवर झेलबाद केले. तीन गडी गमावल्यानंतर कॅप्टन रोहलेने हरिसबरोबर शतकी भागीदारी पूर्ण करत संघाला दीडशे धावांच्या पलीकडे नेले. 43 धावा केल्यावर हरिस अंकोलकरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. हरीस बाद झाल्यावर अन्य खेळाडूही बाद होत राहिले पण, दुसर्‍या टोकाला कर्णधार रोहेलने संयम पूर्ण फलंदाजी करत शतक पूर्ण केले. यानंतर, अंकोलकरने इरफान खान आणि अब्बास आफ्रिदीला खेळपट्टीवर जास्त काळ राहू दिले नाही आणि पाकिस्तानचा स्कोअर अचानक 173 धावांवर 3 विकेट वरून 185 धावांवर ६ बाद असा झाला. यानंतर कर्णधार नईमने 117 धावांची खेळी केली, पण आकाशने त्याला एलबीडब्ल्यू बाद केले. त्याच्या बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा विजय हा केवळ औपचारिकता ठरला.