
संपूर्ण क्रिकेट विश्वातील चाहत्यांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याला आता काहीच तास शिल्लक आहेत. या सामन्याच्या एक दिवस आधी या दोन्ही संघाचे सर्वात मोठे फॅन्स म्हणून ओळखले जाणाऱ्या भारताच्या सुधीर आणि पाकिस्तानच्या चाचा यांनी मँचेस्टर मध्ये एकत्र येऊन आनंद साजरा केला. उद्या हा सामना इंग्लंड मधील मँचेस्टर (Manchester)येथे खेळला दुपारी तीन वाजल्यापासून खेळाला जाणार आहे. या दोन्ही देशातील परस्पर संबंध व या आधीचा विश्वचषक सामन्यातील ( ICC World Cup 2019) इतिहास पाहता ही मॅच देखील चांगलीच रंगणार यात काहीच शंका नाही. मात्र या दोन्ही क्रिकेट चाहत्यांनी "उद्याची मॅच हा एक खेळ आहे आणि त्याला खेळासारखेच बघितले जावे अशी इच्छा व्यक्त केली पण असे असले तरी आपण आपल्या देशाच्या संघाला पाठिंबा देणारच आहोत असे देखील स्पष्ट केले.
मागील काही दिवसांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या दृष्टीने दोन्ही देशातील जाहिरातींमार्फत युद्ध सुरु होत. भारताने मौका मौका थीम वर बनवलेल्या जाहिरातीला उत्तर म्हणून पाकिस्तानने भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्यासारख्या एका व्यक्तीला दाखवत आपणच जिंकणार असा अवाजवी विश्वास दाखवला होता. मात्र आज या दोन्ही फॅन्सनी एकत्र येऊन आपल्या ऐक्याचे आणि खिलाडू वृत्तीचे दर्शन घडवून दिले. मँचेस्टर येथे आयोजित केलेल्या या छोट्या सोहळ्यात सुधीर, चाचा आणि अन्य देशातील फॅन्सची उपस्थिती लक्षणीय ठरली. IND vs PAK, ICC World Cup 2019: भारतीय युट्युबर्स ने 'Wing Commander Abhinandan' च्या जाहिरातीला नवीन 'Mauka-Mauka' द्वारे दिले सडेतोड उत्तर, (Video)
पहा या सोहळ्याची एकी झलक..
या सोहळ्यानंतर आता उद्याच्या भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात कोण जिंकतंय याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या शिवाय क्रिकेट चाहते या सामन्यात पावसामुळे कोणताही अडथळा येऊ नये अशी प्रार्थना करत आहेत.