
ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या T20 विश्वचषक 2022 (T20 WC 2022) मधून चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. आता या स्पर्धेतील टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील अंतिम सामना बघायला मिळू शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या नेदरलँडविरुद्धच्या पराभवाने यातील रोमांच वाढवला आहे. वास्तविक, रविवारी सकाळी अॅडलेडमध्ये नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला सामना झाला. यामध्ये आफ्रिकन संघाचा 13 धावांनी दारूण पराभव झाला. यासह भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित झाले आहे. मेलबर्नमध्ये आज भारताचा शेवटचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. यात भारताचा पराभव झाला तरी फरक पडणार नाही.
उपांत्य फेरीतील चार संघ दाखल
आफ्रिकेच्या पराभवासह भारतीय संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा तिसरा संघ ठरला आहे. पण आता ग्रुप-2 मधून उपांत्य फेरी गाठणारा चौथा संघ पाकिस्तान ठरला आहे. पाकिस्तानने बांग्लादेशचा पराभव करुन उपांत्य फेरीत आपली जागा कायम केली आहे. (हे देखील वाचा: PAK vs BNG: पाकिस्तानने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव करत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरीत मारली धडक, शाहीन आफ्रिदी चमकला)
जाणून घेऊया भारत-पाकिस्तान फायनलचे समीकरण
पाकिस्तान संघाने बांगलादेशला हरवले आहे तसेच भारतीय संघाने झिम्बाब्वेला हरवले, तर टीम इंडिया गट-2 मध्ये अव्वल आणि पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर राहून पात्र ठरेल. या स्थितीत भारतीय संघाचा उपांत्य फेरीचा सामना इंग्लंडशी होईल. तर पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंड संघाशी होणार आहे. यानंतर उपांत्य फेरीत भारतीय संघासोबत पाकिस्तानलाही आपला सामना जिंकावा लागेल. या सगळ्यानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचतील. त्यानंतर 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये दोन्ही संघांमध्ये विजेतेपदाची लढत होणार आहे.