आशिया चषकादरम्यान झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्याने चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर निराशा झाली होती. या सामन्यात भारताची फलंदाजी झाल्यानंतर झालेल्या पावसामुळे पूर्ण सामनाच रद्द करण्यात आला होता. यानंतर दोन्ही संघाना एकेक गुण हा बहाल करण्यात आला होता. पाकिस्तान संघ या सामन्यानंतर तीन गुणासंह सुपर फोरमध्ये दाखल झाला. सोमवारी भारत आणि नेपाळच्या सामन्यात भारताने दुबळ्या नेपाळवर 10 विकेट्सने मात करत तीन गुणांसह सुपर फोरमध्ये प्रवेश हा केला आहे. भारताच्या या सुपर 4 मधल्या प्रवेशामुळे आता भारत पुन्हा एकदा आता पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. 10 तारखेला हे दोन्ही संघ श्रीलंकेच्या प्रेमदासा स्टडिअमवर आमनेसामने येणार आहे. (हेही वाचा - Asia Cup 2023, IND vs NEP Live Score Updates: भारताचा नेपाळवर 10 विकेट्सने विजय, रोहित शर्मा आणि शुभमन गिलचे अर्धशतके)
दरम्यान सोमवारी नेपाळविरोधात झालेल्या सामन्यामध्ये भारतानं तब्बल 10 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीत प्रवेश केला आहे. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमांनुसार भारताला विजयासाठी 23 षटकात 145 धावांचे आव्हान दिले होते. भारताने हे आव्हान सहज पार केले. भारताने 20.1 षटकात 147 धावांपर्यंत मजल मारली.रोहित शर्माने नाबाद 74 तर शुभमन गिल याने नाबाद 67 धावांची खेळी केली. रोहित शर्माला या सामन्यात मॅन ऑफ दी मॅच ठरला.