ICC WTC Final 2021: भारत-न्यूझीलंड निर्णायक सामन्यासाठी राखीव दिवसाच्या तिकीट दरांत कपात, पाहा तिकिटांची नवीन किंमत
WTC फायनल राखीव दिवस तिकिटे (Photo Credit: Twitter/ICC)

ICC WTC Final 2021: साउथॅम्प्टन (Southampton) येथे भारत (India) आणि न्यूझीलंड  (New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Cahmpionship) फायनल सामन्याचा खेळ पावसामुळे बिघडला आहे. 18 जून रोजी मूलतः विजेतेपदाच्या निर्णायक सामन्याची सुरुवात होणार होती पण पहिल्या दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला आणि दुसऱ्या दिवसापासून सामन्याची सुरुवात झाली. अशास्थितीत आता 23 जून रोजी दोन्ही संघात राखीव दिवशी  (Reserve Day) देखील सामना रंगणार आहे. आयसीसीने देखील या दिवसाची तयारी सुरु केली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या राखीव दिवसाच्या तिकिट दरात कपात करण्यात येणार असल्याची आयसीसीने (ICC) जाहीर केले आहे. (IND vs NZ WTC Final 2021: ‘मूड स्विंग झाला, पण चेंडू...’, टिम इंडिया वेगवान गोलंदाजांच्या स्विंगच्या कमतरतेवर माजी क्रिकेटर नाराज)

पहिल्या दिवसाचा खेळ पावणे धुवून काढल्यावर दुसऱ्या दिवशी 64.4 ओव्हरचा सामना रंगला तर रविवारी तिसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये 76.3 ओव्हरचा खेळ झाला. आता पहिले सत्र वाया गेले असल्यामुळे चौथ्या दिवसाच्या खेळावरही परिणाम झाला असून आयसीसीने राखीव ठेवलेला सहावा दिवस नक्कीच अंमलात येणार आहे. “हो, सहाव्या दिवसाच्या तिकिटांच्या किंमतीत कपात केली जाईल. युनायटेड किंगडममध्ये खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यांची ही एक प्रमाणित प्रथा आहे. हा कसोटी सामना केवळ यूके रहिवाशांसाठी खुला असल्याने आयसीसी त्याच मार्गदर्शक तत्त्वांचे अनुसरण करीत आहे,” सोमवारी आयसीसीच्या एका सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

दरम्यान यापूर्वी डब्ल्यूटीसी फायनलसाठी तिकिटांच्या किंमतीची तीन गटात विभागणी करण्यात आली असून जीबीपी 150 (15,444 रुपये), जीबीपी 100 (10,296 रुपये) आणि जीबीपी 75 (7722 रुपये) होते. तथापि आता राखीव दिवशी या तिकिटांची किंमत कमी करत नवीन दर खालीलप्रमाणे आहेत. जीबीपी 100 (10,296 रुपये), जीबीपी 75 (7722 रुपये) आणि जीबीपी 50 (5148 रुपये) आहेत. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान साउथॅम्प्टनच्या हॅम्पशायर बाउल येथे होणार होता. पण येथील हवामानाची परिस्थितीत लक्षात घेता आयसीसीने राखीव दिवस ठेवला होता. तसेच जर सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल.