IND vs NZ WTC Final 2021: ‘मूड स्विंग झाला, पण चेंडू...’, टिम इंडिया वेगवान गोलंदाजांच्या स्विंगच्या कमतरतेवर माजी क्रिकेटर नाराज
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

साउथॅम्प्टन (Southapton) येथे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test ChampionshiP) फायनल सामन्याचा तिसऱ्या दिवस टीम इंडियासाठी (Team India) कठीण ठरला. 146/3 धावसंख्येपासून तिसऱ्या दिवशी सुरुवात करणारा विराट कोहली आणि संघ पट्ट्यासारखा विखुरला आणि पहिल्या डावात काईल जेमीसनच्या घातक गोलंदाजीमुळे 217 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडच्या (New Zealand) सलामीवीर - टॉम लाथम आणि डेव्हन कॉनवेने - संघाला चांगली सुरुवात करून दिली. भारतीय गोलंदाज देखील शानदार बोलिंग करत होते पण, ड्युक्स बॉलमधून (Dukes Ball) स्विंगची कमतरता स्पष्टपणे दिसत होती. त्यामुळे इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना पुरेशी संधी मिळू शकली नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांना स्विंगची कमतरता पाहून माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक मजेदार ट्विट पोस्ट केले आणि गोलंदाजांबाबत निराशा व्यक्त करत लिहिले, “मूड स्विंग झाला पण चेंडू नाही.” (IND vs NZ WTC Final 2021: 'वर्ल्ड क्लास' विराट कोहलीची विकेट घेऊन Kyle Jamieson खुश, पाहा काय म्हणाला किवी गोलंदाज)

न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना आपल्या स्विंगच्या जाळ्यात अडकवले. परंतु तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यात यश आले नाही परिणामी न्यूझीलंड संघातील फलंदाजांना धावा करणे सोपे झाले. न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली. सेहवाग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप अ‍ॅक्टिव्ह राहतो आणि बर्‍याचदा आपल्या मजेदार पोस्ट्सने तो सोशल मीडियावर यूजर्सची मनं जिंकतो.

डब्ल्यूटीसीच्या फायनलच्या चौथ्या दिवसाबद्दल बोलायचे तर पावसाची कृपा राहिल्यास 101/2 धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात करेल. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कर्णधार केन विल्यमसन 12 धावा करून खेळत होता तर रॉस टेलर त्याला साथ देण्यासाठी मैदानात उतरला होता. किवी संघासाठी पहिल्या डावात अद्याप सलामी फलंदाज डेव्हन कॉनवेने सर्वाधिक 54 धावांची अर्धशतकी खेळी तर टॉम लाथम 30 धावाच करू शकला. दुसरीकडे, भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली होती. न्यूझीलंड संघ टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 217 धावांच्या प्रत्युत्तरात 116 धावांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे आता पावसाळी वातावरण आणि सामन्याचे काही दिवस शिल्लक असताना कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.