झुलन गोस्वामी (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

Women's World Cup 2022: टीम इंडियाची (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) गुरुवार, 10 मार्च रोजी हॅमिल्टन (Hamilton) येथे महिला विश्वचषक 2022 च्या त्यांच्या दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंड (New Zealand) संघाविरुद्ध सामन्यात आपल्या नावे एक मोठा विक्रम करू शकते. झुलनच्या नावावर सध्या 38 वर्ल्ड कप विकेट्स आहेत, तर ती ऑस्ट्रेलियन लीन फुलस्टनच्या 39 विकेट्सची बरोबरी करण्यापासून एक पाऊल दूर आहे आणि महिला वर्ल्ड कपमध्ये (Women's World Cup) सर्वाधिक विकेट्स घेणारी खेळाडू बनण्यासाठी तिला दोन विकेट्सची आवश्यकता आहे. तथापि झुलन गोस्वामीने सामन्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी सांगितले की ती वैयक्तिक टप्प्यांबद्दल फारशी काळजी करत नाही आणि संघासाठी सामने जिंकण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते. तसेच 39 वर्षीय वेगवान गोलंदाजाने आतापर्यंत 196 एकदिवसीय सामन्यांमध्ये 247 विकेट्स आहेत आणि 250 बळींचा टप्पा गाठण्यासाठी तिला आणखी तीन विकेट्सची गरज आहे. (IND vs PAK Women's World Cup 2022: पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाची विश्वचषकात अपराजित मालिका कायम, सलामीच्या सामन्यात 107 धावांनी पराभवाची चव चाखली)

“प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला ते माहित नव्हते... मला याची माहिती नाही. पण महत्वाची गोष्ट संघाची वरिष्ठ सदस्य म्हणून मी चांगली कामगिरी केली पाहिजे, लवकर यश मिळवून द्यायला हवे,” न्यूझीलंडविरुद्ध सामन्याच्या पूर्वसंध्येला झुलन म्हणाली. “आम्ही पाकिस्तानविरुद्ध एक गट म्हणून चांगली गोलंदाजी केली – वेगवान गोलंदाजांना सुरुवातीच्या विकेट मिळाल्या, तर फिरकीपटूंना खेळपट्टीवर चांगले टर्न मिळाले. पाकिस्तानला 150 धावसंख्ये खाली रोखण्याचा भारतीय संघाचा चांगला प्रयत्न होता,” ती पुढे म्हणाली. आगामी सामन्याबद्दल बोलताना गोस्वामी म्हणाले की, न्यूझीलंडविरुद्ध योग्य भागात गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे. “...न्यूझीलंडविरुद्ध, योग्य क्षेत्रात गोलंदाजी करणे महत्त्वाचे आहे. मैदान खूपच मोकळे आहे, वारे नेहमीच वाहत असतात त्यामुळे या गोष्टींचा फायदा कसा घ्यायचा. आम्ही अनेक गोष्टींवर चर्चा केली,” ती म्हणाली.

मिताली राजच्या भारतीय संघाचा सामना आता हॅमिल्टनमध्ये यजमान न्यूझीलंडशी होणार आहे – ज्यांनी सध्या सुरु असलेल्या विश्वचषकात एक समान जिंकला आहे आणि एका सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. तर भारताने नुकतीच न्यूझीलंडसोबत एकदिवसीय मालिकेतही सहभाग घेतला होता ज्यामध्ये त्यांना 4-1 असे पराभवाचे तोंड पाहायला लागले. टीम इंडिया गेल्या 4 सामन्यांपासून अपराजित आहे आणि गुरुवारी विजय मिळवल्यास उपांत्य फेरी गाठण्याची त्यांची शक्यता आणखी वाढते.