IND vs NZ T20I 2021: आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) स्पर्धेत निराशाजनक प्रवासानंतर बीसीसीआयने (BCCI) आता न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) आगामी मालिकेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ (Indian Team) जाहीर करण्यात आला आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) मालिकेसाठी संघातून वगळण्यात आले आहे. संघातील त्याचे स्थान गेल्या काही महिन्यांपासून रडारवर होते, विशेषत: जेव्हा तो चेंडूने खेळ करण्यात अयशस्वी ठरला. गेल्या काही काळापासून तो टीम इंडियासाठी (Team India) कमजोर कडी बनला आहे. हार्दिकला त्याच्या खराब फिटनेसमुळे गोलंदाजी करता येत नाही, तर तो बॅटने फारसा लयीत नाही आहे. अशा परिस्थितीत हार्दिकची जागा घेऊ शकेल असा घातक अष्टपैलू खेळाडू आहे. आणि यामुळे संघातील त्याचे स्थान कायमचे त्याच्या हातून जाऊ शकते. (IND vs NZ 2021: युवा खेळाडूंची उघडले टीम इंडियाचे दार; वेंकटेश अय्यर, रितुराज गायकवाड यांच्यासह IPL स्टार्सने मारली बाजी)
आयपीएलमधून व्यंकटेश अय्यरच्या (Venkatesh Iyer) रूपात टीम इंडियाला आणखी एक अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. दुखापतींनी त्रस्त असलेल्या हार्दिकची संभाव्य बदली म्हणून अय्यरकडे पहिले जात आहे. केकेआरचा सलामीवीर व्यंकटेश अय्यरने युएई आवृत्तीतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. वेगवान फलंदाजी सोबतच अय्यर गोलंदाजीतही पारंगत आहे. ताबडतोड फटके खेळण्यासोबतच तो विकेटही घेऊ शकतो. आगामी काळात तो भारतीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमवू शकतो. यामागे एक मोठे कारण देखील आहे की भारताला हार्दिकचा अजून पर्याय मिळालेला नाही आणि अय्यर हे काम करू शकतो. टी-20 विश्वचषकानंतर अय्यरला न्यूझीलंडविरुद्ध मालिकेसाठी भारतीय इलेव्हनमध्ये स्थान दिले जाऊ शकते.
याशिवाय आगामी काळात अय्यर लवकरच भारतीय संघात आपले स्थान निश्चित करेल यात शंका नाही. तो हार्दिक पांड्याचा सर्वात मोठा पर्याय म्हणून सध्या निवड समितीच्या समोर आहे. हार्दिकचा अलीकडचा फॉर्म पाहता त्याला लवकरच संघातून वगळले जाऊ शकते असे निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत हार्दिकनंतर अय्यर त्याची जागा हिसकावण्याच्या तयारीत आहेत. लक्षात घ्यायचे की भारत न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.