IND vs NZ: हेगले ओव्हल मैदानाबाहेर लहान मुलाने केली जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल, BCCI ने शेअर केला Video
(Photo Credit: Getty/Twitter)

क्राइस्टचर्च (Christchurch) मधील हेगले ओव्हल मैदानावर न्यूझीलंडच्या (New Zealand) वेगवान हल्ल्यासमोर भारतीय संघ (Indian Team) संघर्ष करत असताना काही मुले स्टेडियमच्या बाहेर क्रिकेट खेळत होती. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर या मुलांचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगा जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) गोलंदाजीच्या शैलीची नक्कल करताना दिसत आहे. बीसीसीआयच्या (BCCI) या व्हिडिओला चाहत्यांकडून पसंत केले जात आहे आणि मुलाचे कौतुकही करत आहेत. बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना परदेशी मुलाला पकडले गेल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी ऑकलंडमध्ये सरावा दरम्यान एक मुलगा बुमराहच्या गोलंदाजीच्या कृतीची नक्कल करताना दिसला होता. (Video: न्यूझीलंडमधील 'या' मुलाने केली जसप्रीत बुमराह च्या बॉलिंगची नक्कल, पाहून नक्की व्हाल अचंबित)

या व्हिडिओमध्ये जेव्हा भारतीय वेगवान गोलंदाजांप्रमाणे गोलंदाजी करण्यास सांगितले गेल्यावर मुलाने तातडीने बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीचे अनुकरण केले. बीसीसीआयने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे आणि त्यास कॅप्शन दिले: “हेगले ओव्हलच्या मैदानाबाहेर काय चालले आहे विचार केलाय? ही मुले काय करत आहेत? हा लहान मुलगा कोणाचे अनुकरण करीत आहे?" व्हिडिओमध्ये हा उदयोन्मुख क्रिकेटपटू बुमराहच्या गोलंदाजीची शैली उत्तमपणे कॉपी करताना दिसत आहे. व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही मिनिटानंतर चाहत्यांनी मुलाची स्तुती करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ येथे पहा...

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने पुन्हा एकदा भारतासाठी कमाल केली. बुमराहने न्यूझीलंडच्या तीन महत्वपूर्ण विकेट घेऊन यजमान संघाचं कंबरडं मोडलं. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने चार आणि बुमराहने तीन गडी विकेट घेऊन भारतासाठी आशा निर्माण केली पण दुसर्‍या डावात पुन्हा फलंदाजांनी निराशा केली. रविवारी झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी दुसर्‍या डावात 90 धावा देऊन 6 विकेट गमावल्यानंतर जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ असलेला भारत गंभीर संकटात सापडला आहे. तिसऱ्या दिवशीही न्यूझीलंड गोलंदाजांनी भारतावर वर्चस्व कायम ठेवले आणि त्यांना दुसऱ्या डावात 124 धावांवर ऑलआऊट केले.