IND vs NZ 4th T20I: सलग दूर सुपर-ओव्हर सामना जिंकत टीम इंडियाने रचला इतिहास, चौथ्या टी-20 सामन्यात बनलेले 'हे' रेकॉर्डस् जाणून घ्या
केन विल्यमसन, मोहम्मद शमी (Photo Credits: Twitter/ Getty Images)

न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळण्यात आलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने (India) सलग दुसऱ्यांदा यजमान संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभूत केले. शानदार कामगिरीच्या जोरावर वेलिंग्टन येथे झालेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) भारताकडून सुपर ओव्हर टाकली आणि फक्त 13 धावा दिल्या. याच्या प्रत्युत्तरात केएल राहुलने (KL Rahul) षटकार आणि एक चौकार ठोकत भारताला आऊट होण्यापूर्वी चांगली सुरुवात करून दिली. शार्दुल ठाकूरने अखेरच्या षटकात एक शानदार गोलंदाजी केली ज्याने भारताला 4 विकेट्स मिळाल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. कॉलिन मुनरो आणि टिम सेफर्ट यांनी प्रभावी अर्धशतक झळकावले परंतु भारताने नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह आणि शार्दूल ठाकूर यांच्या गोलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडसोबत बरोबरी साधली. (IND vs NZ 4th T20I: सलग दुसऱ्या सुपर-ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव, मनोरंजक सामना जिकंत टीम इंडियाने घेतली 4-0 ने आघाडी)

या सामन्यात बनलेल्या या रेकॉर्डस्वर एक नजर पाहा:

1. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध न्यूझीलंडच्या ईश सोढी ने सर्वाधिक विकेट्सची नोंद केली. सोढीने भारतविरुद्ध आजवर 17 गडी बाद केले आहेत.

2. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज कॉलिन मुनरोने आज टी -20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक झळकावले. टी -20 क्रिकेटमध्ये त्याने 3 शतकंही केली आहेत.

3. कोलिन मुनरोनेही आज टी -20 आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 1700 धावा पूर्ण केल्या.आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात 1700 धावा करणारा तो 16 वा खेळाडू ठरला.

4. ओव्हर एलिमिनेटरच्या माध्यमातून सलग टी-20 जिंकणारा भारत पहिला संघ ठरला, तर न्यूझीलंडने सर्वाधिक सुपर सामने गमावले आहे.

न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये 13 धावा करत भारताला 14 धावांचे लक्ष्य दिले. टीम सेफर्ट (Tim Seifert) 8 आणि कॉलिन मुनरो (Colin Munro) ने 5 धावा केल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी सुपर ओव्हर खेळली. राहुल 10 आणि कोहलीने 6 धावा करत भारताला विजय मिळवून दिला.