IND vs NZ 4th T20I: सलग दुसऱ्या सुपर-ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव, मनोरंजक सामना जिकंत टीम इंडियाने घेतली 4-0 ने आघाडी
विराट कोहली (Photo Credit: AP/PTI)

न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्याचा निकाल पुन्हा एकदा सुपर-ओव्हरने लागला. सलग दुसऱ्या सामन्यात सुपर ओव्हर खेळणाऱ्या न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये 13 धावा करत भारताला 14 धावांचे लक्ष्य दिले. टीम सेफर्ट (Tim Seifert) 8 आणि कॉलिन मुनरो (Colin Munro) ने 5 धावा केल्या. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांनी सुपर ओव्हर खेळली. राहुल 10 आणि कोहलीने 6 धावा करत भारताला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून मुनरो आणि सेफर्टने यापूर्वी अर्धशतकी डाव खेळला. या सामन्यात विजय मिळवत भारताने 4-0 ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे हा किवी संघाचा सुपर ओव्हरमध्ये सलग दुसरा पराभव आहे. भारताने यापूर्वीच मालिका जिंकली, तर न्यूझीलंड अजूनही पहिल्या विजयाच्या शोधात आहे. मुनरोने 64, सेफर्ट 57 धावा केल्या. तर भारताकडून शार्दूल ठाकूर ने 2, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. यापूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी भारतीय संघाने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य ठेवले होते. आणि किवी संघाने पुन्हा एकदा सलग दुसऱ्या सामन्यात तितक्याच धाव केल्या. (IND vs NZ 4th T20I: वेलिंग्टन स्टेडियममध्ये न्यूझीलंडविरुद्ध फॅन्सने झळकावलं 'We Miss You Dhoni' चं पोस्टर, पाहा Tweet)

166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिला झटका पाचव्या षटकात लागला जेव्हा मार्टिन गप्टिल बुमराहच्या चेंडूएवर केएल राहुलकडे 8 चेंडूत 4 धावा करून झेलबाद झाला. सलामीवीर कॉलिन मुनरोने 38 चेंडूत अर्धशतक ठोकले. मात्र, 84 च्या वैयक्तिक स्कोअरवर विराट कोहलीच्या जबरदस्त थ्रोमुळे तो धावबाद झाला. त्यानंतर चहलने टॉम ब्रुसला शून्यावर क्लीन बोल्ड केले. रॉस टेलर याने 24 धावा केल्या आणि सेफर्टला चांगली साथ दिली. आजच्या सामन्यात किवी संघाने गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीने वर्चस्व कायम ठेवले.

वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंड संघाचा नियमित कर्णधार केन विल्यमसनच्या अनुपस्थितीत टिम साऊथीने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत मनीष पांडेयाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 165 धावा केल्या. भारताकडून मनीष 36 चेंडूत 50 धावा आणि नवदीप सैनी 9 चेंडूत 11 धावा करून नाबाद परतले.