भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात वेलिंग्टनमध्ये (Wellington) सुरु असलेल्या चौथ्याआंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यादरम्यान चाहत्यांना महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ची आठवण आली. वेलिंग्टनमधील स्काय स्टेडियमवर काही चाहत्यांनी बॅनर लावले होते, ज्यावर असे लिहिले होते की, 'आम्हाला तुझी आठवण येते धोनी'. धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषक (World Cup) दरम्यान खेळला होता, तेव्हापासून तो क्रिकेटमधून ब्रेक घेत होता. न्यूझीलंडविरुद्ध विश्वचषक उपांत्य सामन्यात धोनीने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. भारत आणि न्यूझीलंडमधील पाच सामन्यांच्या मालिकेतला चौथा सामना वेलिंग्टनमध्ये खेळला जात आहे. विश्वचषक स्पर्धेपासूनच सतत अशी चर्चा सुरू होती की धोनी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो, मात्र स्वत: धोनीने याबाबत अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. (IND vs NZ 4th T20I: मनीष पांडे चे झुंजार अर्धशतक, टीम इंडियाचे न्यूझीलंडला 166 धावांचे लक्ष्य)
बीसीसीआयने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर 'वि मिस यु धोनी'च्या पोस्टरचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "फक्त चाहत्यांची गोष्टी'. यावर्षी बीसीसीआयने कराराच्या यादीत धोनीच्या नावाचा समावेश केला नव्हता. सध्या धोनी आपल्या कुटुंबियांसह आणि मित्रांसमवेत दर्जेदार वेळ घालवत आहे. पाहा हा फोटो:
Just fan things 😎#NZvIND pic.twitter.com/dS7NRvlfQM
— BCCI (@BCCI) January 31, 2020
न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या सामन्यात रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना टीम इंडियामधून विश्रांती देण्यात आली असून तिघांच्या जागी संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. या सामन्यात टॉस जिंकून न्यूझीलंड कर्णधार टिम साऊथीने गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत, भारताने 8 गडी गमावून 165 धावा केल्या.