India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Match Scorecard: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (Test Series) शेवटचा सामना 1 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) मुंबईतील (Mumbai) वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. न्यूझीलंडचा संघाचा पहिला डाव 235 धावांवरच आटोपला. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने 82 आणि विल यंगने 71 धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजाने 5 आणि वॉशिंग्टन सुंदरने 4 विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 4 विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज सकाळी जेव्हा खेळाला सुरवात झाली तेव्हा गील आणि पंतने चांगली भागिदारी केेली. पंरतू लंच ब्रेकच्या पुर्वी पंत बाद झाला. (हेही वाचा - IND vs NZ 3rd Test 2024 Day 2 Live Score Update: शुभमन गिलचे शतक हुकले, एजाज पटेलने 90 धावांवर केले बाद )
पाहा पोस्ट -
Innings Break! #TeamIndia post 263 on the board, securing a 28-run lead!
Scorecard ▶️ https://t.co/KNIvTEy04z#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/sY2zHOS5t5
— BCCI (@BCCI) November 2, 2024
यानंतर भारताचे विकेट काही काही वेळानंतर पडू लागले. भारताकडून शुभमन गिलने एकहाती किल्ला लढवत ठेवला त्यांने टीम इंडियासाठी सर्वाधिक 90 धावांची खेळी केली. त्याच्या या शानदार खेळीच्या जोरावर भारताने 263 धावांपर्यंत मजल मारली. सध्या आहे. एजाज पटेलने भारताच्या 5 विकेट मिळवल्या असून न्यूझीलंडचा सर्वात यशश्वी गोलंदाज ठरला. वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजीतही शानदार नाबाद 38 धावा केल्या.
3RD Test. WICKET! 0.5: Tom Latham 1(4) b Akash Deep, New Zealand 2/1 https://t.co/Vz7cIv1znY #INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) November 2, 2024
सध्या न्युझीलंडच्या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली असून पहिल्याच षटकात आकाश दिपने कर्णधार टॉम लॅथमला बाद केले आहे. किवीची धावसंख्या 1 बाद 2 झाली आहे.