IND vs NZ 3rd T20I: रोहित शर्मा चे तुफानी अर्धशतक, भारता चे न्यूझीलंडला विजयासाठी 180 धावांचे लक्ष्य
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: IANS)

हॅमिल्टनच्या सीडेन पार्क येथे भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात तिसरा सामना खेळला जात आहे. भारतीय संघाविरुद्ध 5 सामन्यांच्या टी -20 मालिकेच्या या तिसर्‍या सामन्यात यजमान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा स्थितीत टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 बाद 179 धावा केल्या आणि न्यूझीलंडसमोर 180 धावांचे आव्हान ठेवला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी टीमसाठी चांगली सुरुवात केली. रोहितने सर्वाधिक 65 धावा केल्या, तर मनीष पांडे 14 आणि रवींद्र जडेजा 10 धावा करून नाबाद परतले. यजमान संघाकडून हमीश बेनेट याने 3, कॉलिन डी ग्रैंडहोम आणि मिशेल सेंटनर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पहिल्या आठ ओव्हरपर्यंत भारताचे एकही विकेट न गमावता 82 धावा केल्या, पण यानंतर 12 व्या ओव्हरपर्यंत संघाची धावसंख्या तीन गडी गमावून 99 धावांवर पोहोचली होती. (IND vs NZ 3rd T20I: रोहित शर्मा ने रचला इतिहास, सलामी फलंदाजांच्या 10 हजारी क्लबमध्ये झाला सामील)

नाणेफेक हरवून प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. रोहित आणि राहुलने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 69 धावा फटकावल्या. यादरम्यान, रोहितने अवघ्या 23 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 40 चेंडूंचा अतीशी डाव खेळल्यानंतर रोहित बाद झाला. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. राहुलच्या रूपात भारताला पहिला धक्का बसला. शानदार फॉर्ममध्ये धावत असलेल्या राहुलला कॉलिन मुनरोकडे ग्रैंडहोमने झेलबाद केले. राहुलनंतर रोहितही बाद झाला. शिवम दुबे यंदा काही खास करू शकला नाही आणि 3 धावा करून पॅव्हिलिअनमध्ये परतला. श्रेयस अय्यर आणि कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोंघांमध्ये भागीदारी होत असताना चुकीचा शॉट खेळत श्रेयस 17 धावांवर आऊट झाला. 160 धावांवर भारताने पाचवी विकेट गमावली. कर्णधार विराट कोहली 38 धावांवर टिम साऊथी कडे कॅच आऊट झाला.

दरम्यान, न्यूझीलंडविरुद्ध या सामन्यात रोहितने सलामी फलंदाजी म्हणून 10,000 आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा गाठला. रोहितपूर्वी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि वीरेंद्र सेहवाग यांनी यापूर्वी ही कामगिरी बजावली आहे.