IND vs NZ 3rd ODI: विराट कोहली याची न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत खराब बॅटिंग, अपेक्षित नसलेल्या 'या' लाजिरवाण्या रेकॉर्डची केली नोंद
विराट कोहली (Photo Credits: Getty Images)

भारत आणि न्यूझीलंड देशांत सध्या तीन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम वनडे सामना खेळला जात आहे. पहिले दोन्ही सामन्यासह मालिका गमावल्यावर टीम इंडिया लाज वाचवण्यासाठी मैदानात उतरली आहे. आजच्या सामन्यात किवी कर्णधार केन विलियम्सनने टॉस जिंकला आणि टीम इंडियाला पाहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत भारताची चांगली सुरुवात झाली नाही आणि 70 धावांच्या आत 3 विकेट्स गमावल्या. विराट कोहली याच्या नेतृत्वात मालिका गमावल्यानंतर भारत पहिल्यांदाच द्विपक्षीय वनडे मालिकेत डेड रबर खेळत आहे. या मालिकेपूर्वी भारताने त्याच्या नेतृत्वात 16 द्विपक्षीय वनडे मालिका खेळल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत विराट कोहली फ्लॉप ठरला आणि मालिकेच्या अखेरच्या सामन्यात 9 धावा करून आऊट झाला. विराट यंदाच्या वनडे मालिकेत प्रभावी कामगिरी करू शकला नाही. आणि एका द्विपक्षीय मालिकेत सर्वात कमी धावांची नोंद केली.

न्यूझीलंडविरुद्ध कोहलीने यंदाच्या वनडे मालिकेत 75 धावा केल्या. कोणत्याही टीमविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत विराटच्या या सर्वात कमी धावा आहे. यापूर्वी त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 2019 च्या मालिकेत 89, 2019 न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत 148 धावा केल्या होत्या. यंदाच्या वनडे मालिकेत विराटची बॅट शांत होती. पहिल्या सामन्यात त्याने 15, दुसर्‍यात 51 आणि तिसर्‍या सामन्यात 9 धावा केल्या. कर्णधार म्हणून कोणत्याही द्विपक्षीय मालिकेत कोहलीची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. भारतीय कर्णधाराला धावांच्या भुकेमुळे 'किंग कोहली' हा दर्जाही मिळाला. पण कुठल्याही क्रिकेट चाहत्याने इत्याच्याकडून इतक्या लाजिरवाण्या विक्रमाची अपेक्षा केली नव्हती, पण त्याने हा रेकॉर्ड नोंदवला आहे.

कोहलीकडून धावांच्या बाबतीत कोणालाही लाजिरवाण्या विक्रमाची अपेक्षा करता येणार नाही, पण यावेळी नक्कीच असे घडले आहे. याखेरीज कप्तानीतही त्याची कामगिरी चांगली नव्हती. टीम इंडियाने कोहलीच्या नेतृत्वात 16 वनडे सामने खेळले ज्यात त्यांनी कामगिरी उत्कृष्ट केली होती. मात्र, कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ प्रथमच सामना खेळत आहे, जो फक्त एक औपचारिक राहिला आहे.