IND vs NZ 3rd ODI: न्यूझीलंडने 5 विकेटने जिंकली तिसरी वनडे, टीम इंडियाचा 3-0 ने क्लीन स्वीप
भारतीय क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/ICC)

पहिले फलंदाजी करत टीम इंडियाने (India) दिलेल्या 297 धावांच्या प्रत्युत्तरात किवी (Kiwi) संघाने 47.1 ओव्हरमध्ये 5 विकेटने विजय मिळवला. मार्टिन गप्टिल (Martin Guptill), हेन्री निकोल्स (Henry Nicholls) यांच्या अर्धशतक आणि अखेरच्या ओव्हरमध्ये टॉम लाथम (Tom Latham), कॉलिन डी ग्रैंडहोम (Colin de Grandhomme) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर किवी संघाने विजय मिळवला आणि मालिकेत टीम इंडियाचा क्लीन स्वीप केला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून 80 निकोल्सने, गप्टिलने 66 धावा केल्या. ग्रैंडहोमने 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. भारताकडून युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याने सर्वाधिक 3, शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. किवी संघाने सुरुवाती पासून पहिले गोलंदाजीत आणि नंतर फलंदाजीत दबाव कायम ठेवला. मालिकेच्या शेवटच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत 7 विकेट गमावून 296 धावा केल्या. (Video: तिसऱ्या वनडे मॅचमध्ये धाव घेताना जेम्स नीशम ने अडवला केएल राहुल चा मार्ग, दोघांमध्ये रंगली मजेदार चर्चा)

297 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गप्टिल आणि निकोल्सने 106 धावांची भागीदारी करत यजमान संघासाला चांगली सुरुवात करून दिली. गप्टिलने अवघ्या 29 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तथापि, गप्टिलला वैयक्तिक 66 धावांवर चहलने बोल्ड करत संघाला मोठ्या प्रतीक्षेनंतर पहिले यश मिळवून दिले. गप्टिल आणि निकोल्सने 15 ओव्हरमधेच 100 धावा पूर्ण केल्या. निकोल्सने 72 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या किवी कर्णधाराला चहलने 22 धावांवर मयंक अग्रवालकडे कॅच आऊट केले. यानंतर मागील दोन्ही सामन्यात प्रभावी कामगिरी करणाऱ्या रॉस टेलरकडून सर्वांना भरपूर अपेक्षा होत्या, पण तो आज 12 धावा करून परतला. निकोल्सही अर्धशतकाचे मोठ्या डावात रूपांतर करू शकला आणि 80 धावांवर आऊट झाला. न्यूझीलंडची पाचवा विकेट जेम्स नीशमच्या रूपात पडली. नीशमने 19 धावा केल्या आणि चहलच्या चेंडूवर कोहलीकडे झेलबाद झाला. त्यानंतर टॉम लाथम आणि कॉलिन डी ग्रैंडहोम यांनी अनुक्रमे नाबाद 32 आणि 58 धावा करत संघाचा विजय निश्चित केला.

टीम इंडियाकडून केएल राहुलने 112 धावा केल्या, श्रेयस अय्यर 62, मनीष पांडेने 42 आणि पृथ्वी शॉने 40 धावा केल्या. हमीश बेनेटने किवी संघाकडून सर्वाधिक 4 गडी बाद केले, तर काईल जैमीसन आणि जेम्स नीशम यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. राहुलच्या शतकी खेळीखेरीज श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे यांच्या अर्धशतकांमुळे भारताला 296 धावांपर्यंत नेले. भारताची सुरुवात खराब झाली आणि त्याने दुसर्‍या ओव्हरमाडे मयंक अग्रवाल आणि त्यानंतर कोहलीच्या महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या.