न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध हेगले ओव्हल मैदानात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने (India) दुसऱ्या डावात यजमान संघाला मालिका 2-0 ने जिंकण्यासाठी 132 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडला पहिल्या डावात 235 धावांवर ऑलआऊट केल्यावर भारताच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराश केले. पहिल्या डावात यजमान टीमविरुद्ध 7 धावांची आघाडी घेतल्यावर भारत दुसऱ्या डावात 124 धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडियाने 90/6च्या पुढे सोमवारी तिसर्या दिवसाचा खेळ सुरू केला. दुसऱ्या डावात भारताकडून चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) ने 24, पृथ्वी शॉ आणि कर्णधार विराट कोहली ने प्रत्येकी 14 धावा केल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्डने (Trent Boult) 4, टिम साउथी (Tim Southee) 3, कॉलिन डी ग्रैंडहोम आणि नील वॅग्नर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. अन्य कोणताही फलंदाज दहाचा आकडाही स्पर्श करू शकला नाही. दुसऱ्या दिवशी मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर रविवारी न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर संपुष्टात आला. दुसर्या दिवशी हेगले ओव्हलमध्ये गोलंदाजांनी 262 धावांवर एकूण 16 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडने सर्व 10 गमावले तर भारताने 6 गडी गमावले.
न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात टॉम लाथमने 52, काईल जैमीसन 49 आणि टॉम ब्लेंडल 30 धावा केल्या. जैमिसनने वॅग्नरसोबत 9 व्या विकेटसाठी 51 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र, त्याचे कारकीर्दीतील पहिले अर्धशतक हुकले. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 4, जसप्रीत बुमराह 3, रवींद्र जडेजा 2 आणि उमेश यादवने 1 गडी बाद केला. वॅटलिंग आणि साऊथीला बुमराहने एकाच ओव्हरमध्ये पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. रवींद्र जडेजाने कॉलिन डी ग्रैंडहोमला 26 धावांवर बोल्ड केले.
शनिवारी नाणेफेक गमावल्यावर पहिले फलंदाजी करत भारताचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला. कर्णधार कोहली, मयंक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, जडेजा आणि उमेश यादव यांना दहाचा आकडाही स्पर्श करता आला नाही. पृथ्वी शॉने 54, हनुमा विहारीने 55 आणि पुजाराने 54 धावा केल्या. दुसरीकडे, न्यूझीलंडकडून आपला दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या काईल जैमीसनने कारकीर्दीत पहिल्यांदा 5 गडी बाद केले.