IND vs NZ 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवशी क्लीन-बोल्ड होताच ‘या’ टीम इंडिया स्टारने पंचांच्या निर्णयाला दिले आव्हान, पहा Video
एजाज पटेलने उडवला अश्विनचा त्रिफळा (Photo Credit: Twitter)

IND vs NZ 2nd Test Day 2: भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मुंबईच्या (Mumbai) प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जात आहे. हा सामना 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार असून सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजी अप्रतिम होती आणि मयंक अग्रवालने शतक झळकावले. तथापि किवी फिरकीपटू एजाज पटेल (Ajaz Patel) देखील पहिल्या दिवशी चार विकेट घेऊन पाहुण्या संघाकडून चमकला. सामन्याचा पहिला दिवस यजमान टीम इंडियाच्या (Team India) नावे राहिला असला तरी दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच प्रकरण अंगलट आले. दुसऱ्याच षटकात एजाज पटेलने सलग दोन विकेट घेतल्या आणि यजमानांना अडचणीत आणले. मुंबई कसोटीदरम्यान दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारताने प्रथम रिद्धिमान साहा आणि आर अश्विनची (R Ashwin) विकेट गमावली . वादात सापडलेल्या अश्विनने या सामन्यात पुन्हा असे काही केले, ज्यामुळे तो चर्चेचा विषय बनला. (IND vs NZ 2nd Test Day 2: मुंबई कसोटीत Ajaz Patel ने केला कहर, 7 वर्षानंतर वानखेडेच्या मैदानात अशी कमाल करणारा बनला पहिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज)

क्रिकेटचे नियम बारकाईने समजून घेणाऱ्या या खेळाडूने क्लीन-बोल्ड झाल्यावर रिव्ह्यू घेतला. अश्विनच्या या निर्णयानंतर असे करता येईल का अशी चर्चा सुरू झाली. मुंबई कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने मैदानात पाऊल ठेवताच त्याला माघारी परतावे लागले. मुंबईत जन्मलेल्या एजाज पटेलने त्याला क्लीन बोल्ड केले आणि तो एकही धाव न करता तंबूत परतला. अश्विन 71.5 षटकांत फलंदाजीला आला आणि एजाजने त्याला फिरकीच्या जाळ्यात अडकवले. समोरून चेंडू स्विंग होऊन थेट ऑफ-स्टंपवर आदळला आणि अश्विनचा त्रिफळा उडाला. अश्विनने लगेच रिव्ह्यू घेण्याचे संकेत दिले. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा कोणी बोल्ड होतो, तेव्हा खेळाडू पंचांकडून रिव्ह्यू करण्याची वाटही पाहत नाहीत. अश्विनच्या निर्णयानंतर रिव्ह्यू घेण्यावर चांगलीच चर्चा रंगली होती. दरम्यान अश्विनने रिव्ह्यू या कारणामुळे घेतला कारण तो गोंधळला होता आणि तो बोल्ड झाला हे त्याला कळले नाही.

दरम्यान, मुंबईत जन्मलेला न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आपल्या मूळच्या मैदानावर जोरदार कामगिरी खेळ करत आहे.  त्याने भारताच्या पहिल्या डावात आतापर्यंत सर्व 6 भारतीय विकेट घेतल्या आहेत. पटेलने दिवसाच्या सुरुवातीला रिद्धिमान साहाच्या विकेटसह पाच बळी पूर्ण केले आणि भारतात कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकत घेणारा न्यूझीलंडचा पहिला फिरकीपटू ठरला. यापूर्वी जीतन पटेलने 2012 मध्ये हैदराबाद येथे 4/100 अशी आकडेवारी नोंदवली होती.