भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand0 यांच्यातील मुंबई कसोटीत फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) इतिहास रचला आहे. भारतीय भूमीवर त्याने जी कामगिरी केली आहे, ती आतापर्यंत कोणताही किवी फिरकीपटू करू शकलेला नाही. एजाजने मुंबई कसोटीच्या (Mumbai Test) पहिल्या डावात भारतीय संघाच्या पहिल्या 6 फलंदाजांना तंबूत पाठवले आहे. यासह तो भारतीय भूमीवर कोणत्याही कसोटीच्या पहिल्या डावात पाच विकेट घेणारा न्यूझीलंडचा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे. इतकंच नाही तर वानखेडेवर एका सामन्यात पाच किंवा अधिक गडी बाद करणारा तो सात वर्षांतील पहिला आंतरराष्ट्रीय गोलंदाज ठरला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)