India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team Pune Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामन्या आजपासून सुरुवात होत आहे. सध्या, भारतीय संघ या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे, कारण बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्यांना 8 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. दुसरा कसोटी सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार असून मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये रोमांचक कसोटी सामना पाहायला मिळणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी खेळला जाईल?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार, 24 ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सकाळी 9:30 वाजता खेळवला जाईल. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd Test 2024 Preview: दुस-या कसोटीत भारत-न्यूझीलंड यांच्यात होणार चुरशीची लढत; हेड टू हेड, खेळपट्टी, मिनी लढाई आणि स्ट्रिमीगसह सर्व माहिती जाणून घ्या)
#TeamIndia eye redemption at Pune 💪
Catch the 2nd #INDvNZ Test, LIVE on #JioCinema, #Sports18 and #ColorsCineplex!#IDFCFirstBankTestTrophy #JioCinemaSports pic.twitter.com/FbDO0APm0D
— JioCinema (@JioCinema) October 24, 2024
कधी अन् कुठे पाहणार सामना?
आम्ही तुम्हाला सांगतो की भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18 आणि कलर्स सिनेप्लेक्स चॅनेलवर उपलब्ध असेल. तर लाइव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमावर उपलब्ध असेल. याशिवाय, लेटेस्टलीच्या वेबसाइटवर तुम्हाला प्रत्येक लाइव्ह अपडेट मिळेल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
भारत: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, रवींद्र जडेजा, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/आकाश दीप.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल, ग्लेन फिलिप्स, टिम साउथी, मॅट हेन्री, विल ओ'रुर्के, एजाज पटेल