भारत विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

IND vs NZ 1st Test Day 4: न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) कानपुर कसोटीत (Kanpur Test) चौथ्या दिवशी टीम इंडियाने (Team India) आपला दुसरा डाव 234/7 धावांवर घोषित केला आहे आणि न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) 65 धावा केल्या. तसेच रिद्धिमान साहाने (Wriddhiman Saha) नाबाद 61 आणि अक्षर पटेलने 28 धावांची नाबाद खेळी केली. याशिवाय रविचंद्रन अश्विनने देखील 32 धावांचे मूल्यवान योगदान दिले. प्रत्युत्तरात दिवसाचा खेळ संपला तेव्हा किवी टीमने एक विकेट गमावून 4 धावा केल्या होत्या. आता कानपुरच्या ग्रीन पार्कवर पाचव्या आणि अंतिम दिवशी इंग्लंडला विजयासाठी अजून 280 धावांची गरज आहे, तर भारताला 9 विकेट्स घेण्याची गरज असेल. चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात किवी गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळेल पण पुढील दोन्ही सत्रात श्रेयस, अश्विन आणि साहाने त्यांना चांगलाच घाम फोडला. काईल जेमीसन (Kyle Jamieson) आणि टिम साउदीने (Tim Southee) प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर एजाज पटेलने 1 गडी बाद केला.(IND vs NZ 1st Test: कानपुरमध्ये Shreyas Iyer याची धमाल, कसोटी पदार्पणात ‘ही’ कमाल करणारा बनला पहिला भारतीय फलंदाज)

तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर 14/1 धावांपासून पुढे खेळत भारताला दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराच्या रूपाने दुसरा धक्का बसला, जो 22 धावांवर टॉम ब्लंडेलकडे विकेटच्या मागे झेलबाद झाला. पुजारा पाठोपाठ रहाणेच्या रूपात संघाला तिसरा धक्का बसला. रहाणे अवघ्या चार धावांवर एजाज पटेलच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू आऊट होऊन माघारी परतला. त्यानंतर साउदीने एकाच षटकात टीम इंडियाला दुहेरी दणका दिला. साउदीच्या पहिल्याच चेंडूवर मयंक अग्रवाल वैयक्तिक 17 धावांवर टॉम लॅथमकडे झेलबाद झाला तर चौथ्या बॉलवर रवींद्र जडेजाला भोपळा न फोडता पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यामुळे कानपूर कसोटी सामन्यात भारतीय संघ अडचणीत सापडला. तथापि अय्यर आणि अश्विनने संयमाने किवी गोलंदाजांचा सामना केला. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाला डाव सावरला. मात्र, जेमीसनने अश्विनला 62 चेंडूत 32 धावांवर क्लीन बोल्ड करून भटकळ सहावा झटका दिला.

तसेच पहिल्या डावात पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावातही संयम दाखवत 109 चेंडूत अर्धशतक झळकावले. चौथ्या दिवशी चहापानाच्या विश्रांतीपूर्वी श्रेयस 125 चेंडूत 65 धावा करून बाद झाला. त्याला टिम साउदीने विकेटकीपर ब्लंडेलच्या हाती झेलबाद केले. अंतिम क्षणी रिद्धिमान साहा आणि अक्षर पटेलने आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.