IND vs NZ 1st ODI: विराट कोहली याने डायरेक्ट थ्रो ने हेन्री निकोल्सला केले रन आउट, Video पाहून तुम्हीही म्हणाल Woww
विराट कोहलीने हेन्री निकोल्सला केले रन आउट (Photo Credit: Twitter)

बुधवारी न्यूझीलंडचा सलामीवीर हेन्री निकोल्स (Henry Nicholls) विराट कोहलीच्या (Virat Kohli) प्रभावी श्रेत्ररसक्षणामुळे बऱ्याच वेळेच्या प्रतिक्षेन्नातर बाद झाला. बुधवारी हॅमिल्टनच्या सेडन पार्क येथे टीम इंडियाने (India) पहिल्या वनडे सामन्यात पहिले फलंदाजी करत 347 धावांचा मोठा डोंगर उभारला. याच्या प्रत्युत्तरात किवी (New Zealand) संघाने चांगली सुरुवात केली. सलामी जोडी मार्टिन गप्टिल आणि निकोल्सने पहिल्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी केली. गप्टिल आऊट झाल्यावरही निकोल्स आपली विकेट सांभाळत खेळत होता. नियमित कर्णधार केन विल्यमसन याच्या अनुपस्थितीत 28 वर्षीय निकोल्सने भारताने दिलेल्या लक्ष्याचा प्रत्युत्तरात महत्त्वपूर्ण खेळी खेळली. पण, खेळपट्टीवर रॉस टेलरबरोबर झालेल्या गोंधळानंतर कोहलीच्या डायरेक्ट थ्रो ने त्याचा डाव संपुष्टात आणला. (Watch: ईश सोढी ने हॅमिल्टन सामन्यात टाकलेली गुगली पाहून चक्रावला टीम इंडिया कर्णधार विराट कोहली, अशा प्रकारे झाला आऊट)

जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर निकोल्स ने फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आणि एक धाव घेण्यासाठी धावला. पण कव्हरवर उभ्या असलेल्या कोहलीने स्फूर्ती दाखवली आणि पुढे येऊन चेंडू स्टंपवर मारला. निकोल्स 82 चेंडूत 78 धावा करून खेळत होता. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची विकेट होती. निकोल्सने डाइव्ह मारली पण, तो वेळे क्रीजच्या आत पोहचू शकला नाही 79 धावांवर धावबाद झाला. पाहा हा व्हिडिओ:

यापूर्वी श्रेयस अय्यर याचे शतक, विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या अर्धशतकी भारताला पहिले फलंदाजी करत 347 धावांपर्यंत मजल मारता आली. त्याआधी पहिला वनडे सामना खेळणारे पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल यांनी भारताला स्थिर सुरुवात करून दिली. सुरुवातीला त्यांना कठीण झाले पण त्यांना त्यातून बाहेर पडण्यात यश आले आणि 50 धावांची भागीदारी केली. परंतु, सलग ओव्हरमध्ये बाद झाल्याने दोघेही चांगली सुरुवात मोठ्या डावात बदलण्यात अपयशी ठरले. पृथ्वी 20 आणि मयंकने 32 धावा केल्या.