IND vs ENG Test Series 2021: भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यात चार सामन्यांच्या कसोटी सामन्यांची मालिका 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून दोन्ही संघांची पहिली टक्कर चेन्नई (Chennai) येथे होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेबद्दल बोलायचे तर बऱ्याच फलंदाजांनाही जबरा कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे दोन्ही संघात झालेल्या आजवर खेळलेल्या मालिकेत फक्त दोन फलंदाजांनी त्रिशतकी मजल मारली आहे. ग्रॅहम गूच (Graham Gooch) यांनी भारताविरुद्धची सर्वात मोठी खेळी खेळली आहे, तर इंग्लंडविरुद्ध भारतासाठी सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम करुण नायरच्या (Karun Nair) नावावर आहे. 2016 मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात नायरने भारतासाठी सर्वात मोठा डाव खेळला होता. नायर इंग्लंडविरुद्ध त्रिशतकी कामगिरी कारण पहिला आणि टेस्टमध्ये त्रिशतकी मजल मारणारा दुसरा भारतीय फलंदाज होता. (IND vs ENG Test Series 2021: भारतीय चाहत्यांसाठी खुशखबर, चेन्नई येथील दुसऱ्या टेस्ट सामन्यासाठी 'इतक्या' प्रेक्षकांना मिळू शकतो ग्रीन सिग्नल)
त्याने चेन्नई कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नाबाद 303 धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने 32 चौकार आणि 4 षटकार लगावले. करुणच्या या खेळीच्या जोरावर भारताने त्या सामन्याच्या पहिल्या डावात 7 विकेट गमावून 759 धावनावर डाव घोषित केला होता. कोणत्याही टेस्ट सामन्यात भारतीय संघाच्या ही सर्वोच्च धावसंख्या होती. नायरनंतर विराट कोहलीने इंग्लंडविरुद्ध सर्वोच्च धावसंख्येची कमाल केली आहे. विराटने इंग्लंड संघाविरुद्ध कसोटीत कर्णधार कोहलीने सर्वाधिक 235 धावा केल्या आहेत. तर याबाबतीत विनोद कांबळी 224 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, भारताविरुद्ध कसोटीत इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ग्राहम गूच यांच्या नावावर असून त्यांनी 333 धावा केल्या आहेत.
दरम्यान, विराटने इंग्लिश टीमविरुद्ध 19 सामन्यात 1570 धावा केल्या असून यंदाच्या चार सामन्यांच्या मालिकेत त्याला दोन हजार धावसंख्या पूर्ण करण्यासाठी 430 धावांची गरज आहे, तर घरच्या मैदानावर कोहलीने 9 सामन्यात इंग्लंडविरुद्ध 843 धावा केल्या आहेत आणि त्याला हजारी टप्पा पार करण्यासाठी 157 धावांची गरज आहे. दुसरीकडे, दोन्ही संघातील मागील तीन मालिकेत इंग्लंड संघाने सहज विजय मिळवला आहे. मात्र, टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म पाहता इंग्लिश टीमसाठी रस्ता खडतर असेल असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.