IND vs ENG Test 2021: घरच्या मैदानावर ब्रिटिश संघाला पराभवाचे पाणी पाजल्यावर टीम इंडिया (Team India) आता इंग्लंडचा (England) सामना करण्यासाठी सज्ज होत आहे. 4 ऑगस्टपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ब्रिटिश संघाचे कठीण आव्हान पेलण्यासाठी भारतीय संघाचे (Indian Team) खेळाडू काउंटी इलेव्हन विरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळत आहेत. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) पहिला कसोटी सराव सामना खेळत नाही आहेत. विराटने दुखापतीमुळे सराव सामन्यातून माघार घेतल्याचे समजले जात आहे. पण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली बुधवारी डरहमच्या (Durham) रिव्हर साइड येथे नेट्समध्ये उतरला. बीसीसीआयने (BCCI) एक व्हिडिओ शेअर केला आहे जेथे कोहली नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. (IND vs ENG 2021: टीम इंडियाला मोठा धक्का, शुभमन पाठोपाठ ‘या’ वेगवान गोलंदाजाच्याही इंग्लंड दौऱ्यातून एक्सिटची शक्यता; County XI सामन्यात झाली दुखापत)
“कर्णधार विराट कोहली फलंदाजी = शुद्ध आनंद,” असे कॅप्शन देत बीसीसीआयने विराटच्या बॅटिंगचा व्हिडीओ शेअर केला. पाठीत कडकपणा जाणवल्यामुळे विराट कोहलीचा सराव सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश झाला नाही. कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेदेखील “त्याच्या डाव्या हाताच्या वरच्या हॅमस्ट्रिंग भोवती सौम्य सूज” असल्यामुळे भारतीय इलेव्हनचा भाग नाही,” बीसीसीआयने मंगळवारी म्हटले. मात्र, 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याआधी दोन्ही खेळाडूंनी पुन्हा पूर्णपणे फिट होणे अपेक्षित आहे. नियमित कर्णधार आणि उपकर्णधारांच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले.
Captain @imVkohli batting = Pure bliss #TeamIndia pic.twitter.com/5EUDxhLwgJ
— BCCI (@BCCI) July 21, 2021
सराव सामन्याच्या पहिल्या डावात भारत 311 धावांवर ऑलआऊट झाला. केवळ केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने आपल्या चान्गल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर केले तर मयंक अग्रवाल, हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा खेळपट्टीवर काही काळ घालवल्यानंतरही प्रभावी कामगिरी करू शकले नाही. राहुलने सर्वाधिक 101 धावा केल्या तर जडेजाने 75 धावा केल्या. राहुलने एक शानदार शतक झळकावत इंग्लंड कसोटी मालिकेत इलेव्हन खेळत जागेसाठी आपली दावेदारी अधिक मजबूत केली आहे. भारत-इंग्लंड यांच्यात ट्रेंट ब्रिज, नॉटिंघॅम येथे भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी सामन्यांची पहिली कसोटी खेळली जाईल.