धरमशाला येथे होणारा भारत आणि इंग्लंड दरम्यानचा सामना भारतीय फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनसाठी खास असणार आहे. टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. अश्विन आता 7 मार्चला कारकिर्दीतील 100 वा सामना खेळणार आहे. या सामन्यापूर्वी अनुभवी गोलंदाज म्हणाला की, 2012 ची इंग्लंडविरुद्धची मालिका त्याच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट होती. त्या मालिकेमुळे त्याला त्याच्या चुका ओळखण्यात आणि सुधारण्यात मदत झाली. अश्विन आता 7 मार्चला कारकिर्दीतील 100 वा सामना खेळणार आहे. (हेही वाचा - India vs England 5th Test 2024: धर्मशाळा कसोटी दरम्यान बर्फवुष्टी होण्याची शक्यता, प्रेक्षकांची होणार निराशा)
भारतासाठी 99 कसोटी सामने खेळलेल्या अश्विनने मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, "इंग्लंडविरुद्धची 2012 ची मालिका माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होती. मला कुठे सुधारणा करण्याची गरज आहे हे मला सांगण्यात आले. याशिवाय, त्याने सांगितले की, त्याच्या कारकिर्दीतील 100 वी कसोटी त्याच्यासाठी खास आहे. ही एक मोठी संधी आहे. हा प्रवास खुप खास होता. यामुळे माझ्या तयारीत कोणताही बदल झालेला नाही. आम्हाला कसोटी सामना जिंकायचा आहे.
2011 मध्ये भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या अश्विनने राजकोट कसोटीदरम्यान 500 कसोटी बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला. त्याच्या आधी माजी कर्णधार अनिल कुंबळेने ही कामगिरी केली होती. त्याच्या नावावर 132 कसोटीत 619 विकेट आहेत.