IND vs ENG 4th Test: ओव्हल टेस्टमध्ये वाढली इंग्लंडची चिंता, चौथ्या दिवशी असे झाल्यास टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग होणार सुकर
टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test: भारत (India) आणि इंग्लंड (England) दरम्यान सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना लंडनच्या ओव्हल (The Oval) मैदानावर खेळला जात आहे. इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा करून घेतलेल्या 99 धावांच्या आघाडीच्या प्रत्युत्तरात सामन्याच्या तिसऱ्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा दबदबा राहिला. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांनी संपूर्ण दिवस गाजवला. पण चौथ्या दिवशी इंग्लिश गोलंदाजांनी पहिल्या सेशनमध्ये 3 भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवले आणि संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. आणि आता भारताकडून रिषभ पंत (Rishabh Pant) व शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) तग धरून खेळत आहेत. शिवाय, आजच्या दिवशी पंत आणि शार्दूलने बॅटने जोरदार प्रदर्शन करून धावा काढल्या व इंग्लंड संघापुढे तीनशे पेक्षा अधिक धावांचे लक्ष्य ठेवले तर भारतीय संघाचा विजयाचा मार्ग सुकर होऊ शकतो. (IND vs ENG: इंग्लंडमध्ये Ajinkya Rahane चा फ्लॉप शो सुरूच, ‘या’ 2 फलंदाजांसाठी खुले होऊ शकते कसोटी संघाचे दार)

चौथ्या दिवसाच्या लंचची घोषणा झाल्यावर सोनी स्पोर्ट्स नेटवर्क एक्सट्रा इनिंग्स दरम्यान इंग्लंडने माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी स्वतः याची पुष्टी केली. हुसेन म्हणाले की, “चौथ्या दिवसापासून संध्याकाळी चेंडू खूप फिरेल. त्यामुळे जर भारताने आज संध्याकाळपर्यंत फलंदाजी केली आणि 300 च्या वर लक्ष्य ठेवले तर भारताचा सहज विजय होईल.” अशा स्थितीत, लंचनंतर पंत आणि शार्दूलवर संघाची आघाडी तीनशेपार नेण्याची मोठी जबाबदारी असेल. पंत सध्या या इंग्लंड दौऱ्यावर बॅटने आपला दम दाखवण्यात अपयशी ठरला आहे, त्यामुळे आजची संधी पंतसाठी सुवर्ण साधी ठरू शकते. तसेच इंग्लंडविरुद्ध ओव्हलवर मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या शार्दूलने जोरदार फटकेबाजी करून पहिल्या डावात धमाकेदार अर्धशतक ठोकले होते. दुसरीकडे, इंग्लंड संघ या दोन्ही खेळाडूंच्या कौशल्याने परिचित असतील त्यामुळे या दोघांना लवकर पॅव्हिलियनमध्ये पाठवून संघाला विजयच्या दिशेने नेण्याचे काम करण्याचा निर्धार करून संघ दुसऱ्या सत्रात मैदानात उतरेल.

दरम्यान, दुसऱ्या डावात भारतीय सलामीवीरांनी आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा व केएल राहुलने 83 धावांची सलामी भागीदारी केली. तर रोहितने 127 धावांची खेळी केली. तसेच पुजाराने 61 धावांची खेळी करत त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर चौथ्या दिवशी अर्धशतकानजीक असलेला कर्णधार विराट कोहली 44 धावांवर माघारी परतला.