विराट कोहली आणि जो रूट (Photo Credit: Instagram)

IND vs ENG 3rd Test:  भारत (India) आणि इंग्लंड (England) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आजपासून लीड्सच्या (Leeds) हेडिंग्ले स्टेडियमवर (Headingley Stadium) खेळला जाईल. या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. आजपासून सुरु होणाऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉस जिंकला आणि पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. लीड्स कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाने (Team India) आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही तर इंग्लिश लॉर्ड्स कसोटीतून इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत.  भारतीय संघ (Indian Team) लॉर्ड्स कसोटीतील प्लेइंग इलेव्हन सोबत मैदानात उतरणार आहे म्हणजेच आर अश्विनला सलग तिसऱ्या सामन्यातून बाहेर बसावे लागणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडने दुखापतग्रस्त मार्क वूडच्या जागी क्रेग ओव्हरटनला संधी दिली आहे. तसेच डोम सिब्लीच्या जागी मर्यादित ओव्हरचा त्यांचा तडाखेबाज फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) याला तब्बल तीन वर्षानंतर इंग्लंड कसोटी इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. (IND vs ENG Test: आजपासून भारत-इंग्लंड तिसरा कसोटी सामना, जाणून घ्या सामना कधी आणि कुठे पाहू शकता ?)

नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित राहिला. शेवटच्या दिवशी खेळ पावसामुळे एकही चेंडू खेळला गेला नाही आणि सामना ड्रॉ घोषित करण्यात आला. त्यानंतर लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाने जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर 151 धावांनी विजय मिळवला. अशा परिस्थितीत टीम इंडियाची नजर आता कसोटी सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेण्यावर असेल. दरम्यान, टीम इंडियाने 2002 मध्ये लीड्सच्या मैदानावर अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यावेळी सौरव गांगुली भारतीय कर्णधार होता. मग 'दादा'च्या ब्रिगेडने इंग्लंड संघाला एक डाव आणि 46 धावांनी धूळ चारली होती. राहुल द्रविडला त्याच्या शतकासाठी 'सामनावीर' (148) देण्यात आले. विशेष म्हणजे लीड्स कसोटी सामन्याच्या एका डावात गांगुली, सचिन तेंडुलकर आणि द्रविड यांनी शंभरी धावसंख्येचा टप्पा पार अनोखा कारनामा केला होता. त्यामुळे यंदाच्या सामन्यात देखील भारतीय फलंदाजी माजी खेळाडूंच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकणार की नाही हे पाहणे उत्साहाचे ठरणार आहे.

पाहा भारत-इंग्लंड लीड्स प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन: जो रूट (कॅप्टन), रोरी बर्न्स, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स/डेविड मलान, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (विकेटकीपर), मोईन अली, सॅम कुरन, ओली रॉबिन्सन, क्रेग ओव्हरटन, जेम्स अँडरसन

भारत प्लेइंग इलेव्हन: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा.