इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) यांच्यात लीड्सच्या (Leeds) मैदानावर 25 ऑगस्टपासून तिसरा कसोटी सामन्याचा थरार रंगणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया (Team India) सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. लॉर्ड्सवर भारताने इंग्लंडचा 151 धावांनी दारुण पराभव केला. जर टीम इंडियाने पुढील टेस्ट मॅच जिंकली तर ते सीरिजमध्ये पराभव होऊ शकणार नाही. लॉर्ड्सवर भारतीय संघाला आपला सर्वात मोठा मॅच-विनर रविचंद्रन अश्विनची (Ravichandran Ashwin) कमतरता जाणवली. नॉटिंगहम आणि लॉर्ड्स कसोटीत अश्विनचा भारतीय संघात (Indian Team) समावेश करण्याची मागणी केली जात होती परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे अश्विनला बाकावरच लागले. दुसऱ्या टेस्ट सामन्यात अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला (Ravindra Jadeja) प्राधान्य दिले गेले होते पण जडेजा बॅट आणि बॉलने प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आता अश्विनच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता देखील वाढली आहे पण लीड्सची परिस्थिती अनुकूल असणे आवश्यक आहे. (IND vs ENG 3rd Test: लीड्स टेस्ट Rohit Sharma याच्यासाठी बनणार ‘गेमचेंजर’, Virat Kohli याला पछाडण्याची हिटमॅनला सुवर्णसंधी)
जर हेडिंग्लेमध्ये ढगाळ स्थिती नसेल तर अश्विनचे संघात पुनरागमन होऊ शकते. पण अश्विनला संधी देणे म्हणजे कर्णधार विराट कोहलीला एका वेगवान गोलंदाजाला विश्रांती द्यावी लागेल. 25 ऑगस्टपासून लीड्समध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन प्लेइंग 11 मध्ये खूप महत्वाचा सिद्ध होऊ शकतो. अश्विनने इंग्लंडविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली होती. अश्विनने चेन्नई कसोटीत चेंडू तसेच बॅटने शानदार खेळी केली होती. अश्विनसमोर इंग्लंड फलंदाज दुबळे दिसत होते. अश्विनच्या गोलंदाजीमध्ये अधिक फरक त्याला प्लेइंग इलेव्हनचे तिकीट मिळवण्यासाठी पुरेसे आहे.
अगर #Headingley में नहीं रहे ओवरकास्ट कंडीशन तो @ashwinravi99 की टीम में हो सकती है वापसी, कप्तान कोहली को एक तेज गेंदबाज को आराम देने होगा. वैसे अंग्रेज टीम वापसी के लिए ग्रीन-टॉप रखना चाहेगी. #IndvsEng #ENGvIND
— Abdulkadir/ अब्दुलकादिर (@KadirBhaidc) August 21, 2021
दुसरीकडे, ब्रिटिश संघ सध्या पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. इंग्लंडचा फलंदाजीक्रम पूर्णतः कर्णधार जो रूटअवलंबून दिसत आहे. पहिल्या सामन्यात अर्धशतकी धावसंख्या गाठणारा जो रूट लॉर्ड्स सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांवर भारी पडला होता. रूटने पहिल्या डावात 180 धावा केल्या व नाबाद परतला. मात्र रूट दुसऱ्या डावात प्रभाव पाडू शकला नाही. पण रूट सर्वोत्तम कामगिरी करणारा आंतरराष्ट्रीय फलंदाज आहे हे टीम इंडियाला लक्षात ठेवणे गरजेचे आहे आणि स्वबळावर सामन्याचा निर्णय बदलण्याची क्षमता देखील त्याच्यात आहे. तसेच इंग्लिश संघ मालिकेत कमबॅक करण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळे रूट पुन्हा पुढाकाराने नेतृत्व करेल हे निश्चित आहे. अस्थितीत ‘विराटसेने’ला त्याच्यावर वेसण घालण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.