इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चर (Photo Credit: Getty)

IND vs ENG 1st Test Day 3: चेन्नई टेस्ट (Chennai Test) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्ठात आला. कर्णधार जो रूट (Joe Root), बेन स्टोक्स डॉम सिब्ली आणि मधल्या फळीतील खेळाडूंच्या योगदानाने पाहुण्या संघाने तिसऱ्या दिवशी लंचपर्यंत संघाने यजमान भारताविरुद्ध (India) धावांचा डोंगर उभारला. अशास्थितीत पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाने (Team India) दुपारच्या जेवणापर्यंत 2 विकेट गमवून 59 धावा केल्या आहेत. लंचची वेळ झाली तेव्हा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) नाबाद 20 धावा आणि विराट कोहली (Virat Kohli) नाबाद 3 धावा करून खेळत होते. यापूर्वी, इंग्लंडकडून कर्णधार रूटने द्विशतकी खेळी केली तर सिब्लीने 87 आणि स्टोक्सने 82 धावांचे योगदान दिले. भारतीय गोलंदाजांना विकेटसाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. जसप्रीत बुमराह आणि आर अश्विनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर इशांत शर्मा आणि शाहबाझ नदीमला 2 विकेट मिळाल्या. (IND vs ENG 1st Test Day 3: जो रूटची द्विशतकी खेळी, भारतीय गोलंदाज हतबल; इंग्लंडचा पहिला डाव 578 धावांवर संपुष्टात)

इंग्लंडसाठी पहिल्या डावात पाचशे पार धावसंख्ये कर्णधार रूटच्या संयमी 218 धावांची खेळी निर्णायक ठरली. चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडने 8 बाद 555 धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली आणि अखेर 23 धावांची भर घातली.  बुमराह आणि अश्विनने इंग्लंडच्या उर्वरित दोन विकेट घेत संघाला 578 धावांवर इंग्लंडला रोखलं. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला जोफ्रा आर्चरने लंचपूर्वी दोन झटके दिले. इंग्लंडने दिलेल्या 578 धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताकडून रोहित आणि शुबमन सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. रोहित शर्माच्या रूपात पहिल्या डावात भारतीय संघाचा जोरदार धक्का बसला. आर्चरच्या चेंडूवर तो मागे विकेटच्या मागे जोस बटलरकडे 6 धावांवर झेलबाद झाला. यानंतर आर्चरने संघाचा दुसरा सलामी फलंदाज शुभमन गिलला 29 धावांवर माघारी धाडलं. जेम्स अँडरसनने शुभमनचा शानदार झेल पकडत सर्वांना चकित केलं.

पहिल्या दिवशी संघ अडचणीत असताना रूटने सलामी फलंदाज सिब्लीबरोबर 200 धावांची भागीदारी केली आणि संघाचा डाव सावरला. दुसऱ्या दिवशीही भारतीय गोलंदाज विकेटसाठी तरसले. पहिल्या सत्रात रूट आणि स्टोक्स यांच्यातील शतकी तर नंतर रूटने ओली पोपसह अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर संघाने मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल केली. पोप 34, जोस बटलर 30 धावा करून झटपट बाद झाले आणि छोटेखानी खेळी करत योगदान दिले. यापूर्वी, इंग्लंडने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सलामीवीर रोरी बर्न्स 60 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला.