IND vs BAN 1st Test Day 1: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, Lunch पर्यंत बांग्लादेशचा स्कोर 63/3
टीम इंडिया (Photo Credit: IANS)

टीम इंडिया आणि बांग्लादेश संघातील 3 सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना इंदोरच्या होळकर स्टेडियममध्ये सुरु झाला आहे. पहिल्या सामन्यात टॉस जिंकून बांग्लादेश (Bangladesh0 ने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, कर्णधाराचा निर्णय फलंदाजांना योग्य ठरवता आला नाही. बांग्लादेशची सुरुवात अगदी संथ झाली. चौथ्या ओव्हरमध्ये बांग्लादेशने पहिली धाव केली. भारतीय (India) गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रामक बॉलिंग केली. लंच वेळ पर्यंत बांग्लादेशने 3 बाद 63 धावा केल्या आहेत. टीम इंडियासाठी उमेश यादव (Umesh Yadav), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammed Shami) यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले. उमेशने संघाला पहिले यश मिळवून देत इम्रुल कायस याला स्वस्तात बाद केले. कायसने 18 चेंडूत 6 धावा केल्या. त्यानंतरच्या ओव्हरमध्ये इशांतने शादमान इस्लाम यालं 6 धावांवर माघारी धाडले. शमीने 13 धावांवर मोहम्मद मिथुन याला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवला. (IND vs BAN 2019 Test: 1 विकेट घेत रविचंद्रन अश्विन याचा अनिल कुंबळे सह 'या' Elite यादीत होईल समावेश, हरभजन सिंह यालाही पिछाडीवर टाकण्याची संधी)

आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बांग्लादेशचा कर्णधार मोमीनुल हक (Mominul Haq) याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये एक बदल करण्यात आला आहे. शाहबाझ नदीम (Shahbaz Nadeem) याच्या जागी इशांत शर्मा (Ishant Sharma) याला संघात स्थान मिळाले आहेत. ही मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे. टी-20 मालिका गमावल्यानंतर बांग्लादेशचे संपूर्ण लक्ष टेस्ट मालिका जिंकण्याकडे असेल, तर टीम इंडिया टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये हॅटट्रिक करण्याच्या प्रयत्नात असेल. या मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यात आली होती. भारताने या मालिकेत 2-1 ने विजय मिळवला होता.

आजवर टीम इंडियाने आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पाच सामने खेळले असून सर्व सामने जिंकल्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, बांग्लादेशी संघ या मालिकेसह टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात करेल.