
ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध महिला टी-20 तिरंगी मालिकेच्या (T20I Tri Series) फायनल लढतीत भारतीय महिला संघाची (India Women's Cricket Team) नजर जेतेपदावर असेल. 21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियामध्ये सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी ही स्पर्धा एक प्रारंभिक कार्यक्रम आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांनी प्रभावी कामगिरी करत फायनलमध्ये स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेत भारताला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. इंग्लंड (England) विरुद्ध महिला टी-20 सामन्यातील दुसऱ्या सर्वात मोठ्या लक्ष्याची पूर्ती केल्यावर टीम इंडियाचा आत्मविश्वास नक्की उंचावला असेल. आणि आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ तसाच आत्मविश्वास कायम ठेवत विजय मिळवण्याचे प्रयत्न करेल. (IND vs AUS Women's Tri-Series: स्मृति मंधाना-शेफाली वर्मा यांची जबरदस्त बॅटिंग, ऑस्ट्रेलियाला पराभूत करत नोंदविला धक्कादायक रेकॉर्ड)
तिरंगी मालिकेतील सातवा आणि अंतिम सामना भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया महिला संघात होईल. हा सामना मेलबर्नमध्ये खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सुरु होईल. भारतीय चाहते हा सामना Sony Six आणि Sony Six HD वर लाईव्ह पाहू शकतात.
पहिल्या तीन लीग सामन्यांत संथ खेळीनंतर भारताने गिअर बदलला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय मिळवला. दोन्ही संघांनी लीग फेरीत एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक-एक सामना जिंकला आहे. स्मृती मंधाना, शेफाली वर्मा आणि हरमनप्रीत कौर सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अंतिम सामन्यात त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी गोलंदाजीत प्रभावी कामगिरी बजावली. मात्र, भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे त्यांची मधली फळी. वेडा कृष्णमूर्ती, तान्या भाटिया यांना अजून यशस्वी कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे, पहिल्या सामन्यात भारताकडून पराभूत झाल्यावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. सलामी फलंदाज बेथ मूनी आणि एशले गार्डनरच्या रूपात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी मजबूत दिसत आहे. मेग लॅनिंग आणि एलिस पेरीही चांगल्या फॉर्ममध्ये आहे.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघ
टीम इंडिया: हर्लीन देओल, स्मृती मंधाना, जेमिमाह रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, तान्या भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, नुझत पारविन, पूजा वस्त्रकर, अरुंधती रेड्डी, शाफाली वर्मा, रिचा घोष.
ऑस्ट्रेलिया: एलिसा हेली (विकेटकीपर), बेथ मूनी, एशले गार्डनर, मेग लॅनिंग (कॅप्टन), एलिस पेरी, राचेल हेन्स, जेस जोनासेन, सोफी मोलिनक्स, अॅनाबेल सदरलँड, डेलिसा किमिन्स, जॉर्जिया व्हेरहॅम, मेगन शूट, जेस जोनासेन, सोफी मोलिनक्स, निकोला केरी, एरिन बर्न्स, तैला व्लेमिंक.