India Vs Australia Delhi ODI 2019: आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील शेवटचा सामना दिल्ली येथील फिरोजशहा कोटला (Feroz Shah Kotla, Delhi ) मैदानात रंगणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी यापूर्वी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी 'आर या पार' ची लढाई असणार आहे. या सामन्याचा टॉस ऑस्ट्रेलिया संघाने जिंकला असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यातील टी -20 सीरीज ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. त्यानंतर आज एकदिवसीय मालिकादेखील खिशात घालण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलिया संघ मैदानामध्ये उतरणार आहे.
#INDvAUS: Australia wins toss, opts to bat against India in the 5th ODI, in Delhi pic.twitter.com/tFb7XDaQwA
— ANI (@ANI) March 13, 2019
Australia win the toss and elect to bat first in the series decider #INDvAUS pic.twitter.com/za5MrR3bpw
— BCCI (@BCCI) March 13, 2019
भारतीय संघात आज दोन बदल करण्यात आले आहेत. रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांना संधी देण्यात आली आहे.तर युझवेंद्र चहल आणि केएल राहुलला आराम देण्यात आला आहे.