विलो पुकोव्हस्की (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारतीय (India) संघात 15 जानेवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेच्या पाचव्या आणि अंतिम टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. ब्रिस्बेनच्या (Brisbane) गब्बा (Gabba) येथे हा सामना खेळला जाणार आहे. सामन्याच्या सुरुवातीला काही तास शिल्लक असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ब्रिस्बेन टेस्टसाठी प्लेइंग इलेव्हन घोषित केला आहे. ऑस्ट्रेलिया इलेव्हनमध्ये दोन बदल झाले आहेत. सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या विल पुकोव्हस्कीची (Will Pucovski) एक्सिट झाली तर त्याच्या जागी मार्कस हॅरिसचा (Marcus Harris) समावेश झाला आहे. पुकोव्हस्कीने सिडनी टेस्ट सामन्यात दमदार डेब्यू केलं. पहिल्या डावात त्याने 62 धावा केल्या तर दुसऱ्या डावात तो 10 धावाच करू शकला. पुकोवस्कीला सिडनी टेस्टच्या दुसऱ्या डावात फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली ज्यामुळे त्याला अंतिम सामन्यातून बाहेर पडावे लागत आहे. गुरुवार, 14 जानेवारी रोजी ब्रिसबेन येथे मालिकेच्या अंतिम कसोटीपूर्वी झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये पुकोवस्की अपयशी ठरला. 2019 मध्ये अ‍ॅशेसपासून हॅरिसने कसोटी क्रिकेट खेळलेले नाही. (Australia Vs India 4th Test: वीरेंद्र सेहवाग यांची बीसीसीआयला ऑफर; दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागेवर खेळण्याची दर्शवली तयारी)

पुकोव्हस्कीच्या अनुपस्थितीमुळे चार सामन्यांच्या मालिकेत हॅरिस ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा पाचवा सलामी फलंदाज आहे. चौथ्या कसोटी सामन्यात कांगारू संघाकडून फलंदाज डेविड वॉर्नरसह हॅरिस सलामीला येईल. सोमवारी तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी मैदानात डाइव्ह घेताना पुकोव्हस्कीच्या खांद्याला दुखापत झाली. सिडनी कसोटीत वॉर्नरसहपुकोव्हस्की सलामीला आता होता आणि सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अर्धशतक ठोकले होते. हॅरिस कांगारू संघाच्या मूळ कसोटी सामील केले नव्हते परंतु पुकोव्हस्की (कन्क्शन) आणि डेविड वॉर्नर (ग्रोईन) यांच्या दुखापतीनंतर त्याला सामील केले गेले. त्यानंतर मेलबर्नमधील दुसर्‍या कसोटीनंतर जो बर्न्सला संघातून वगळण्यात आल्यावर त्याला कायम ठेवण्यात आले होते. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी संध्या 1-1 अशा बरोबरीत आहे आणि चौथा सामना जिंकणारा संघ मालिका काबीज करेल.

ऑस्ट्रेलिया इलेव्हनः डेविड वॉर्नर, मार्कस हॅरिस, मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड,कॅमरून ग्रीन, टिम पेन (कॅप्टन), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड आणि नॅथन लायन.