IND vs AUS 4th Test Day 2: दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला; पहिल्या डावात टीम इंडियाच्या 2 बाद 62, ऑस्ट्रेलियाच्या अद्याप 307 धावांची पिछाडी
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा (Photo Credit: PTI)

IND vs AUS 4th Test Day 2: ब्रिस्बेन टेस्टच्या (Brisbane Test) दुसऱ्या दिवशी पावसाने व्यत्यय आणल्याने दुसऱ्या सत्रानंतरचा खेळ सुरूच झाला आणि पाऊस थांबल्यावर ओल्या खेळपट्टीमुळे दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. कांगारू संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या डावात 369 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात टीम इंडियाने (Team India) 2 विकेट गमावून 26 ओव्हरमध्ये 62 धावा केल्या आहेत. अद्याप भारत 307 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली असल्याने त्यापुढील खेळ सुरु झालेला नाही. टीमसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 19 चेंडूंत नाबाद दोन धावा आणि चेतेश्वर पुजारा (Chesteshwar Pujara) 49 चेंडूंत नाबाद आठ धावा करून खेळत आहे. रोहित शर्मा 44 तर शुभमन गिल 7 धावा करून माघारी परतले. पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी संघाला प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यावर रहाणे आणि पुजारावर संघाची मदार असेल. (IND vs AUS 4th Test 2021: काय करायचं याचं! रोहित शर्माने आपली फेकली विकेट आणि सुनील गावस्कर यांचा पार चढला, पहा काय म्हणाले)

भारताच्या पहिल्या डावाची वाईट सुरुवात झाली आहे. युवा ओपनर शुभमन गिल 7 धावांवर बाद झाला. कमिंसच्या गोलंदाजीवर स्मिथने सोपा झेल घेत गिलला मागारी धाडलं. त्यानंतर रोहित आणि पुजारा या दोघांनी सावध पवित्रा घेतला आणि 49 धावांची भागिदारी केली असताना भारताला दुसरा धक्का बसला. रोहित 44 धावांवर लायनच्या चेंडूंवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात फळास आणि मिचेल स्टार्कने अप्रतिम झेल घेत रोहितला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 5 बाद 274 धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली होती.  ऑस्ट्रेलिया कर्णधार टिम पेनने 50 धावा, मॅथ्यू वेडने 45 आणि कॅमेरॉन ग्रीनने 47 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण या दोघांचेही अर्धशतकं थोडक्यात हुकले. तसेच तळातील फलंदाजांपैकी मिशेल स्टार्कने नाबाद 20 धावा, लायनने 24 धावा आणि जोश हेजलवूडने 1 धावांचे योगदान दिले. पेन आणि ग्रीनने 98 धावांची भागिदारी करुन संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्याच्या दिशेने कूच केली. दुसरीकडे, भारतासाठी शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर सिराजने एका ऑस्ट्रेलियन फलंदाजाला माघारी धाडलं.

ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी मार्नस लाबूशेनने शानदार शतक ठोकले होते. कारकीर्दीतील 5वे शतक झळकावत त्याने सार्वधिक 108 धावा केल्या. शिवाय, मॅथ्यू वेडने 45 तर स्टीव्ह स्मिथने 36 धावांचे योगदान दिले. डेविड वॉर्नरच्या अपयशाचे सत्र यंदाही सुरूच राहिले. वॉर्नरला 1 च्या वैयक्तिक धावसंख्येवर मोहम्मद सिराजने पहिल्या दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी धाडलं.