IND vs AUS 4th Test 2021: काय करायचं याचं! रोहित शर्माने आपली फेकली विकेट आणि सुनील गावस्कर यांचा पार चढला, पहा काय म्हणाले
रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेनमधील गाब्बा (Gabba) येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या सत्रात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बाद झाल्यानंतर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar ) यांचा पार चढला आणि हिटमॅनच्या शॉटची निवड पाहून लिटिल मास्टरला निराश झाले. दिवसाच्या पहिल्या सत्रात कांगारू संघाला 369 धावांवर आटोपल्यावर भारतीय संघाची (Indian Team) सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिल फक्त 8 धावा करून माघारी परतला. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर संघाचा डाव पुढे नेण्याची जबाबदारी होती. पुजारा सावध फलंदाजी करत असताना रोहित काही आक्रमक शॉट खेळत होता. या दरम्यान, रोहितने मारलेला शॉट पाहून गावस्कर संतापले आणि म्हटले की भारत सलामी फलंदाजासारख्या अनुभवी खेळाडूने खेळणे हा “बेजबाबदार” शॉट आहे. रोहित 44 धावांवर फलंदाजी करीत होता आणि गब्बा येथे 100वी कसोटी सामना खेळत असलेल्या नॅथन लायनच्या चेंडूवर त्याने आपली विकेट फेकली जेव्हा संघाला भक्कम भागीदारीची गरज होती. (IND vs AUS 4th Test Day 2: ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा धडाका, Tea ब्रेकपर्यंत 62 धावांवर टीम इंडियाचे दोन्ही ओपनर माघारी)

Channel 7 साठी कमेंटरी करणाऱ्या गावस्कर यांनी ऑन-एअर रोहितला खडेबोल सुनावले आणि म्हटले, "का? का? का? तो एक अविश्वसनीय शॉट आहे. तो एक बेजबाबदार शॉट आहे. तेथे लॉन्ग ऑन एक फील्डर आहे, तेथे डीप स्वेअरयामध्ये एक फील्डर आहे. यापूर्वी, काही चेंडूवर तू चौकार खेचलेस आणि आता हा शॉट का खेळता? आपण ज्येष्ठ खेळाडू आहात, असा शॉट खेळण्याबाबद कोणतेही कारण खपवून घेतले जाणार नाही, त्या शॉटसाठी कोणतेही कारण नाही. एक अनावश्यक विकेट, अनावश्यक विकेट गिफ्ट केली. पूर्णपणे अनावश्यक." विशेष म्हणजे, तो "बेजबाबदार शॉट" खेळल्यानंतर रोहित अस्वस्थ दिसत होता कारण त्याच्या पायाला त्रास झाल्याचे दिसले. टीम इंडिया ओपनर सावधपणे पॅव्हिलियनमध्ये परतला.

रोहितला परदेशातील परिस्थितीत त्रास होत आहे. परंतु तिसर्‍या कसोटी सामन्यात तो इलेव्हनमध्ये आला तेव्हापासून तो खात्रीशीर आणि ठाम दिसत होता. रोहित आक्रमक शॉट्स खेळून बाद झाला आहे. सिडनीच्या दुसऱ्या डावात रोहित अर्धशतकी खेळी करून माघारी परतला, त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये तरी हिटमॅन शतकी धावसंख्या गाठेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, पहिल्या डावात रोहितने चाहत्यांची निराश केली.