IND vs AUS 4th Test 2021: वॉशिंग्टन सुदंरने पहिली टेस्ट विकेट म्हणून स्टिव्ह स्मिथला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता, रोहित शर्माने पकडला जबरदस्त कॅच, पहा Video
स्टिव्ह स्मिथ बनला वॉशिंग्टन सुंदरचा पहिला शिकार (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 4th Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) गब्बा (Gabba) येथील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेच्या चौथ्या आणि अंतिम सामन्यात टीम इंडियाकडून (Team India) टी नटराजन (T Natarajan) आणि वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांनी डेब्यू केलं आहे. पहिला आंतरराष्ट्रीय टेस्ट सामना खेळणाऱ्या नटराजनला अद्याप एकही विकेट मिळाली नाही तर वॉशिंग्टन सुंदर याबाबतीत नशिबाचा धनी निघाला. तामिळनाडूच्या ऑफस्पिनर अष्टपैलू खेळाडूने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) 36 धावांवर माघार धाडलं व पदार्पणाच्या हा प्रसंग आणखीन विशेष केला. टीम इंडियामध्ये रविचंद्रन अश्विनच्या (Ravichandran Ashwin) जागी सामील झालेल्या सुंदरीने दुपारच्या जेवणानंतर लगेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांवर हल्ला चढवला. दोन्ही ओपनर स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतल्यावर स्मिथ आणि लाबूशेनने डाव सर्वांनाच प्रयत्न केला, पण ज्येष्ठ फलंदाज सुंदरच्या जाळ्यात अडकला आणि माघारी परतला. (IND vs AUS 4th Test 2021: रोहित शर्माने अफलातून कॅच घेत डेविड वॉर्नरला धाडलं तंबूत, पाहून तुम्हीही म्हणाल जबरदस्त Watch Video)

नवीन ओव्हरचा पहिला चेंडू सुंदरने चेंडू स्मिथच्या पॅडवर टाकला जो फलंदाजाने फ्लिक केला पण चेंडू थेट स्वेअर लेगवर उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला ज्याने दिवसाचा दुसरा कॅच पूर्ण केला. अशा प्रकारे सुंदरने त्याच्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात स्टिव्ह स्मिथच्या विकेटच्या रुपाने केली. त्यापूर्वी अश्विनने त्याची कसोटी कॅप दिल्यानंतर सुंदर भारताचा 301 वा कसोटी क्रिकेटपटू बनला. योगायोगाने, प्लेइंग इलेव्हनमध्ये सुंदरीने अश्विनची जागा घेतली ज्याने मालिकेच्या पूर्वार्धात स्मिथला तीन वेळा बाद केले होते - अ‍ॅडिलेड, मेलबर्न आणि सिडनी येथे अश्विनने स्मिथला माघारी धाडलं आहे. त्यामुळे, ऑफस्पिनरकडून स्मिथ चौथ्यांदा बाद झाला आहे.

दरम्यान, दुपारच्या जेवणानंतर कांगारू संघाने स्मिथच्या रूपात तिसरी विकेट गमावली. यापूर्वी, पहिल्या सत्रात डेविड वॉर्नर आणि मार्कस हॅरिस स्वस्तात माघारी परतले आहे. स्मिथ बाद झाल्यावर मॅथ्यू वेड मैदानावर आला असून मार्नस लाबूशेनसह डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. सावध खेळ करत त्यांनी धावफलक हलता ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 100 धावा पूर्ण झाल्या असून संघ बॅटफुटवर असताना सावध खेळ करत लाबूशेनने अर्धशतक झळकावलं आहे. लाबूशेनने 145 चेंडूत 3 चौकारांच्या सहाय्याने 50 धावा केल्या.