IND vs AUS 4th Test 2021: ब्रिस्बेनमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात, दुसऱ्या सत्रानंतरचा खेळ थांबला, पहा व्हिडिओ
ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड (Photo Credits: Twitter/BCCI)

IND vs AUS 4th Test Day 2: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे खेळल्या जाणार्‍या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचे दुसरे सत्र संपल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली असल्याने त्यापुढील खेळ सुरु झालेला नाही. ब्रिस्बेनमध्ये पावसाचा जोर जास्त असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे पुढील खेळ होणार की नाही याबाबद शंक्य व्यक्त होत आहे. टीम इंडियाने (Team India) चहापानापर्यंत दोन विकेट गमावून 62 धावा केल्या आहेत. टीमसाठी कर्णधार अजिंक्य रहाणे 19 चेंडूंत नाबाद दोन धावा आणि चेतेश्वर पुजारा 49 चेंडूंत नाबाद आठ धावा करून खेळत आहे. रोहित शर्मा 44 तर शुभमन गिल 7 धावा करून माघारी परतले. पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांनी संघाला प्रत्येकी एक विकेट मिळवून दिली. सलामी जोडी स्वस्तात बाद झाल्यावर रहाणे आणि पुजारावर संघाचा डाव सावरण्याची मोठी जबाबदारी असेल. (IND vs AUS 4th Test 2021: काय करायचं याचं! रोहित शर्माने आपली फेकली विकेट आणि सुनील गावस्कर यांचा पार चढला, पहा काय म्हणाले)

यजमान ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला डाव 369 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे टीम इंडिया पहिल्या डावात अजूनही 307 धावांनी पिछाडीवर आहे. भारताने पहिल्या डावात फक्त 11 धावनावर शुभमनची विकेट गमावली. त्यानंतर रोहित आणि चेतेश्वर पुजाराची जोडी जमली होती. यादरम्यान, रोहितने काही चांगले फटके खेळले मात्र, 100वा टेस्ट सामना खेळणाऱ्या नॅथन लायनच्या चेंडूवर मिचेल स्टार्ककडे चुकीचा फटका मारत कॅच आऊट झाला. रोहितने 74 चेंडूंचा सामना करत 6 चौकार ठोकले. यापूर्वी, अनुभवहीन भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 369 धावांवर गुंडाळला होता. ऑस्ट्रेलियन डाव संपल्यानंतर लंच घोषित करण्यात आले. यजमान संघाने दुसर्‍या दिवशी पाच बाद 274 धावांवर पुढे खेळण्यास सुरुवात केली.

यापूर्वी ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी मार्नस लाबूशेनने शानदार शतक ठोकले होते. कारकीर्दीतील 5वे शतक झळकावत त्याने सार्वधिक 108 धावा केल्या. शिवाय, मॅथ्यू वेडने 45 तर स्टीव्ह स्मिथने 36 धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलिया कर्णधार टिम पेनने 50 आणि कॅमरून ग्रीनने 47 धावांचे योगदान दिले. शार्दुल ठाकूर, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर मोहम्मद सिराजने एका ऑस्ट्रेलियन फलंदाजाला माघारी धाडलं.