IND vs AUS 4th Test 2021: ओह्ह! पहिल्या दिवशी अजिंक्य रहाणेची ही चूक टीम इंडियाला पडली महागात, पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल (Watch Video)
अजिंक्य रहाणेने सोडला मार्नस लाबूशेनचा सोपा कॅच (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 4th Test 2021: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) कसोटी मालिकेचा चौथी कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाब्बा मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या क्षणी रोहित शर्माच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे रोमांच निर्माण झाला तर काही सोपे कॅच सुटल्यामुळे भारतीय छावणीत निराशा पसरली. यापैकी ऑस्ट्रेलियाचा नंबर 3 फलंदाज मार्नस लाबूशेनचा (Marnus Labuschagne) कॅच सोडणे टीम इंडियाला (Team India) खरचं महागात पडले. टीम इंडियाने नियमित अंतराने विकेट घेत सामन्यात रंगात आणली होती आणि कांगारू संघावरील पकड कायम ठेवली होती. मात्र, कर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) लाबूशेनचा कॅच पकडला असता तर त्यांना यजमान संघावर वर्चस्व गाजवले असते. अजिंक्यच्या त्या चुकीचा फटका आता संघाला बसताना दिसत आहे कारण कांगारू संघ त्रिशतकी धावसंख्येचा जवळ पोहचला आहे. लाबूशेन 37 आणि 48 धावांवर खेळत असताना रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने कांगारू संघाच्या फलंदाजीचा कॅच सोडला. खराब क्षेत्ररक्षणाचा फटका संपूर्ण टीम इंडियाला सहन करावा लागला. (IND vs AUS 4th Test Day 1: मार्नस लाबूशेनच्या शानदार शतकाने पहिल्या दिवसावर कांगारू संघाचा दबदबा, गब्बा टेस्टच्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाचा स्कोर 274/5)

नवदीप सैनीच्या 36व्या ओव्हरमधील 5वा चेंडू लाबूशेनएन गलीच्या दिशेने खेळला. तेथे फिल्डिंगसाठी उपस्थित असलेल्या अजिंक्य रहाणेने मोठी चूक केली आणि एक सोपा कॅच सोडला. तेव्हा लाबूशेन वैयक्तिक 37 धावांवर खेळत होता. रहाणेच्या या चुकीमुळे लाबूशेनने 5वे टेस्ट शतक झळकावले आणि गब्बाच्या मैदानावर डॉन ब्रॅडमन यांच्या सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. त्यानंतर नटराजनने 46व्या ओव्हरमधील 5वा चेंडू टाकला तेव्हा लाबूशेन 48 धावांवर फलंदाजी करत होता. चेंडू त्याच्या बॅटच्या कडेला लागून स्लिपवर उभ्या असलेल्या पुजाराकडे गेलं जो डाईव्ह मारून झेल पकडण्यात अपयशी ठरला. रहाणे आणि पुजाराने लाबूशेनचा झेल सोडला नसता तर ऑस्ट्रेलियाचा हा फलंदाज आपले 5वे कसोटी शतक झळकावण्यात यशस्वी झाला नसता. पहा रहाणेचा ड्रॉप कॅच:

ब्रिस्बेन येथे पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून अंतिम सत्रात कांगारू फलंदाजांनी वर्चस्व गाजवले. दिवसाखेर संघाने 5 विकेट गमवून 274 धावा केल्या आहेत. अष्टपैलू कॅमरुन ग्रीन आणि कर्णधार टिम पेन यांच्यातील अर्धशतकी भागीदारीने दिवसाखेर संघाला त्रिशतकी धावसंख्येचा जवळ पोहचवले आहे.