IND vs AUS 3rd Test Day 2 Stats: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पूर्ण केली षटकारांची शंभरी, SCG मध्ये दुसऱ्या दिवशी बनले 'हे' प्रमुख रेकॉर्ड
शुभमन गिल (Photo Credit: PTI)

IND vs AUS 3rd Test Day 2: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) संघातील सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील (Sydney Cricket Ground) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. SCG मध्ये दुसऱ्या दिवशी कांगारू संघाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ (Steve Smith), मार्नस लाबूशेन, भारताचा युवा सलामी फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) यांच्याकडून प्रभावी बॅटिंगची झलक पाहायला मिळाली. स्मिथने कसोटी कारकिर्दीतील 27वे तर टीम इंडियाविरुद्ध कसोटी करिअरमधील आठवे शतक ठोकले. स्मिथच्या 131 धावांच्या जोरावर आणि लाबूशेन व नवख्या विल पुकोवस्की यांच्या अनुक्रमे 91 आणि 62 धावांच्या जोरावर कांगारू संघाने पहिल्या डावात 338 धावांपर्यंत मजल मारली. शिवाय, गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे टीम इंडिया दिवसाखेर 2 बाद 96 धावांपर्यंतच मजल मारू शकली. सिडनी येथे तिसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी दोन्ही संघातील खेळाडूंनी काही अन्य रेकॉर्डची नोंद केली जी खालीलप्रमाणे आहेत. (IND vs AUS 3rd Test Day 2: दुसऱ्या दिवसाखेर टीम इंडिया 2 बाद 96 धावा, सिडनी टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाकडे 242 धावांची आघाडी)

1. रोहित शर्माने नॅथन लायनच्या 16व्या ओव्हरमध्ये एक खणखणीत षटकार खेचला आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला.

2. शुभमन गिलने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्ट सामान्य पदार्पण करणारा शुभमन ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी क्रिकेटत सर्वात युवात अर्धशतक झळकावणारा भारत पहिला सलामीवीर फलंदाज ठरला.

3. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. यासह कसोटी क्रिकेटमाडेच सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अमित मिश्राला मागे सोडले आहे. मिश्राने कसोटी क्रिकेटमध्ये 76 विकेट्स घेतल्या आहेत तर बुमराहने 78 गडी बाद केले आहेत.

4. सिडनी टेस्टमधील स्टिव्ह स्मिथने 27वे कसोटी शतक झळकावले. आता सक्रिय कसोटी खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या यादीत स्मिथने भारतीय कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली.

5. शिवाय, स्मिथचे भारताविरुद्ध 8वे शतक ठरले. स्मिथ आता भारताविरुद्ध सर्वाधिक शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे.

6. यादीत स्मिथपूर्वी विव रिचर्ड्स, गॅरी सोबर्स आणि रिकी पॉन्टिंग यांच्याही समावेश आहे. या तीनही दिग्गज फलंदाजांनी टीम इंडियाविरुद्ध प्रत्येकी 8 शतकं केली आहेत.

7. स्मिथने कसोटी क्रिकेटमधील सर्वात कमी डावात 27 शतकांच्या बाबतीत भारतीय कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांना मागे टाकले आहे. स्मिथने 136 डावात हा पराक्रम केला तर विराटने आणि सचिनने प्रत्येकी 141 आणि पॉन्टिंगने 154 डावात हा टप्पा गाठला होता.

8. जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनला भोपळा फोडू न देता पॅव्हिलियनमध्ये पाठवलं. अशाप्रकारे, कसोटी क्रिकेटमध्ये बुमराह ऑस्ट्रेलियन कर्णधाराला सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने आतापर्यंत 5 वेळा टिम पेनला बाद केले आहे.

9. स्टीव्ह स्मिथला त्याच्या 27व्या कसोटी शतकासाठी 490 दिवसाची प्रतीक्षा करावी लागली. भारताविरुद्ध हे आठवे कसोटी शतक आहे.

भारताने दुसऱ्या दिवसाखेर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांची विकेट गमावली. शर्मा 26 धावा करुन जोश हेजलवुडचा बळी ठरला तर शुभमन पॅट कमिन्सच्या चेंडूवर अर्धशतक करताचकॅमरुन ग्रीनकडे झेलबाद झाला.