IND vs AUS 3rd Test 2021: स्टीव्ह स्मिथने तीन वर्षानंतर ऑस्ट्रेलियामध्ये ठोकले टेस्ट शतक; विराट कोहली, रिकी पॉन्टिंग यांची केली बरोबरी
विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथ (Photo Credit: Getty)

IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथला (Steve Smith) अखेर सूर गवसला आणि 2021 च्या पहिल्या डावात 27वे कसोटी शतक ठोकले आणि विराट कोहलीची (Virat Kohli) प्रदीर्घ क्रमवारीत बरोबरी साधली. मागील 4 कसोटी डावात फक्त 10 धावा करणाऱ्या स्मिथने सिडनी कसोटीत (Sydney Test) भारताच्या (India) नवख्या नवदीप सैनीच्या चेंडूवर तीन धाव घेत तीन आकडी धावसंख्या गाठली. स्मिथचे हे सप्टेंबर 2019 नंतर पहिले शतकही केले ठरले. माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराने मॅनचेस्टरमध्ये इंग्लंडविरुद्ध 211 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीसह स्मिथने भारतीय कर्णधार विराटच्या कसोटी क्रिकेटमधील 7,318 धावांनाही मागेही मागे टाकले. तसेच, सक्रिय क्रिकेटरमध्ये स्मिथ आणि कोहलीची सर्वाधिक कसोटी शतकं केली आहेत. दुसरीकडे, स्मिथने तीन वर्षानंतर पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) खेळत शतकी धावसंख्या पार केली आहे. स्मिथने ब्रिस्बेनमध्ये इंग्लंडविरुद्ध नाबाद 141 आणि अखेर मेलबर्न येथे नाबाद 102 धावांची खेळी केली होती. (IND vs AUS 3rd Test Day 2: स्टिव्ह स्मिथच्या दमदार शतकी खेळीने ऑस्ट्रेलियाची त्रिशतकी मजल, भारताविरुद्ध सिडनी टेस्टच्या पहिल्या डावात केल्या 338 धावा)

भारताविरुद्ध सिडनी कसोटीत स्मिथ चांगल्या लयीत खेळत होता. स्मिथने 98व्या षटकात 201 चेंडूत 13 चौकारांसह त्याचे कारकिर्दीतील 27वे कसोटी शतक पूर्ण केले. 35व्या ओव्हरमध्ये स्मिथ फलंदाजीला आला आणि मार्नस लाबूशेनसह शतकी भागीदारी केली. सामन्या दरम्यान स्मिथवर खूप दबाव होता पण त्याने आपल्या शतकी खेळीने टीकाकारांना आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. तसेच स्मिथने आपल्या शंभरीने कांगारू संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली. स्मिथचे भारताविरुद्ध हे आठवे शतक होते आणि ऑस्ट्रेलियाच्या पॉन्टिंग आणि वेस्ट इंडिजची जोडी विव्ह रिचर्ड्स व गारफिल्ड सोबर्स यांच्यानंतर कसोटी सामन्यात भारताविरुद्ध आठ शतके ठोकणारा तो चौथा खेळाडू ठरला. तथापि, स्मिथने अवघ्या 13 सामन्यांत हा टप्पा गाठला आहे. एससीजी येथे भारताविरुध्द मागील आठ सामन्यांमध्ये स्टीव्ह स्मिथने 117, 71, 105, 28, 105, 104, 46, 24 आणि आता 131 धावांची कामगिरी बजावली आहे.

दरम्यान, सिडनीमध्ये सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकून फलंदाजी करत कांगारू संघाने त्रिशतकी धावसंख्या गाठली आहे. स्मिथचे शतक वगळता लाबूशेनने 91 आणि आपला पहिला आंतरराष्ट्रीय टेस्ट सामना खेळणाऱ्या विल पुकोवस्कीने 62 धावांचे योगदान दिले.