Babul Supriyo Slams Hanuma Vihari: बाबुल सुप्रियो यांची दुखापतग्रस्त हनुमा विहारीच्या संथ खेळीवर आक्षेपार्ह पोस्ट, नेटिझन्सने भाजप खासदाराला धरलं धारेवर
हनुमा विहारी आणि बाबुल सुप्रियो (Photo Credits: Twitter)

IND vs AUS 3rd Test 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी क्रिकेट ग्राउंडवरील (SCG) तिसऱ्या टेस्ट मॅचच्या 5व्या दिवशी हनुमा विहारीच्या (Hanuma Vihari) संथ खेळीवरील पोस्टमुळे भाजपा (BJP) खासदार बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांना सोशल मीडियावर ट्रोलर्सचा सामना करावा लागला. सिडनी (Sydney) येथे नुकत्याच संपुष्टात आलेल्या कसोटी सामन्यात भारताला वाचवण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने विहारी हॅमस्ट्रिंग दुखापतींसह फलंदाजी करीत होता. खेळपट्टीवर फिरताना अस्वस्थ असूनही फलंदाजी करणाऱ्या 27 वर्षीय विहारी रविचंद्रन अश्विनबरोबर क्रीजवर होता. रिषभ पंतची तडाखेबाज खेळी आणि विहारी-अश्विनच्या चिवट खेळीने टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीतील पराभव टाळला. सध्या दोन्ही संघातील मालिका 1-1 अशा बरोबरीत असून 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे चौथा आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे. “109 चेंडूत 7 धावा” करण्याच्या विहारीच्या संथ खेळीवर सुप्रियो यांनी कठोर प्रतिक्रिया दिली 'अत्याचारी' असे संबोधले. (AUS vs IND 3rd Test 2021: बापरे! हनुमा विहारीची संथ खेळी, SCG येथील दुसऱ्या डावात नाबाद 15 धावांच्या खेळीत केला इतक्या चेंडूंचा केला सामना)

“9 धावा करण्यासाठी 109 चेंडू खेळणे! याला किमान अत्याचारी बोलले पाहिजे. ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी हनुमा विहारीने भारताची कोणतीही शक्यता नष्ट केली नाही तर क्रिकेटचीही हत्या केली आहे. दूरस्थपणे विजयाचा पर्याय जरी ठेवला नाही तरी तो गुन्हेगार आहे,” केंद्रीय मंत्र्यांनी ट्विट केले. “पीएस: मला माहित आहे की मला क्रिकेटबद्दल काहीच माहित नाही,” त्यांनी पुढे पोस्टमध्ये म्हटले.

अन्सानसोलच्या खासदारांना या पोस्टनंतर यूजर्सने धारेवर धरलं आणि विहारीच्या ‘खेळाची परिस्थिती समजून न घेणं’ आणि “अनावश्यक ट्वीट” यावर चाहत्यांनी त्याच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बर्‍याच नेटिझन्सनीही या पोस्टमधील ‘मूर्खपणा’ ही निदर्शनास आणून दिला आणि त्यांना ट्विट हटवण्यास सांगितले. पोस्टवरील काही प्रतिक्रिया पहा.

विहारी आज एक उत्तम काम केले

पोस्ट हटवण्यास सांगितले

सर्वत्र ढवळाढवळ करू नको

विहारी प्रयत्नशील आहे

तो हॅमस्ट्रिंगसह खेळत आहे

'खरोखर एक मूर्ख ट्वीट'

दरम्यान, विहारी आणि अश्विनने मिळून अंतिम सत्रात 200 हुन अधिक चेंडू खेळून काढले. पाचव्या दिवशी भारताने चांगली सुरुवात केली. पण रिषभ पंत 97 धावा आणि चेतेश्वर पुजारा 77 धावांवर बाद झाल्यानंतर भारताला विहारी आणि अश्विन संघाला पुढे एकही फटका बसू दिला नाही आणि सामना अनिर्णीत करण्याच्या दिशेने वळवला.