IND vs AUS 3rd ODI 2019: ऑस्ट्रेलिया संघाने 'टीम इंडीया' वर केली 32 धावांनी मात; उस्मान ख्वाजा 'मॅन ऑफ द मॅच'
उस्मान ख्वाजा (Photo Credits: Getty Images)

India vs Australia Ranchi ODI: भारत (India) विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Australia) तिसऱ्या  एकदिवसीय सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारतावर 32 धावांनी मात केली आहे. नाणेफेक जिंकत भारतीय संघ पहिल्यांदा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारताला ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखणं कठीण झाल्याने सुरूवातीपासूनच ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी तडाखेबाज फलंदाजी करत 313 धावा केल्या. भारताला या धावसंख्येचा टप्पा पार करताना दमछाक झाली. भारतीय संघ 281 धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियन खेळाडू उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) 'मॅन ऑफ द मॅच'ठरला.

ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाचे शतक (104) आणि कर्णधार फिंचची 93 धावांची खेळी मजबुत झाल्याने ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या रचली. भारताकडून या धावसंख्येचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीने शतक ठोकले. एकदिवसीय कारकिर्दीतील विराट कोहलीचे हे 41 वे शतक आहे. या शतकासह कोहलीने एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी अशा तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून 29 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.भारताची सुरूवात अडखळत झाल्याने इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं भारतासमोर आव्हान होतं. भारताकडून कुलदीपने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. IND vs AUS 3rd ODI 2019: पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली देण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ आर्मीची कॅप घालून मैदानात उतरणार, MS Dhoni ने केलं camouflage capsचं वाटप (Watch Video)

भारताने 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. आजचा रांची सामना जिंकत मालिका खिशात घालण्याच्या उद्देशाने भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरला होता. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचा विजयरथ रोखला.