अजिंक्य रहाणे, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 2nd टेस्ट (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs AUS 2nd Test Day 3 Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ थोड्याच वेळात सुरु होणार आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Grond) खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने वर्चस्व गाजवले असून तिसऱ्या दिवशी मोठी आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असतील. भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अ‍ॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 2nd Test 2020-21: मेलबर्न येथे बॉक्सिंग डे टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बनले 'हे' प्रमुख रेकॉर्ड, वाचा सविस्तर)

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 195 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेचे च्या नाबाद 104 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर 277 धावा केल्या असून 82 धावांची आश्वासक आघाडी घेतली आहे. आता तिसऱ्या दिवशी भारत आपली आघाडी वाढवण्याच्या प्रयत्नात असेल. प्रभारी कर्णधार रहाणेने  12 चौकारांसह 12वे कसोटी शतक झळकावलं. विशेष म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या खेळात रहाणेने हनुमा विहारी, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा यांच्यासोबत महत्वपूर्ण भागीदारी करत भारतीय संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन

भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.