IND vs AUS 2nd Test Day 2 Live Streaming: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Day Test) मॅचच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (Melbourne Cricket Ground) खेळला जाईल. पहिल्या दिवशी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेला ऑस्ट्रेलिया संघ (Australia Team) दिवसाचा खेळ पूर्ण होण्यापूर्वी द्विशतकी धावसंख्या पार करू शकला नाही आणि संपूर्ण संघ 195 धावांवर ऑलआऊट झाला. त्यामुळे आता टीम इंडिया (Team India) दुसऱ्या दिवशी आपला सर्वोत्तम खेळ करत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता सुरु होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 2nd Test Day 1 Stumps: MCG मध्ये शुभमन गिलची आक्रामक सुरवात, पहिल्या दिवसाखेर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या 159 धावांनी पिछाडीवर)
भारताकडून शुभमन गिल आणि मयंक अग्रवालची जोडी सलामीला उतरली, मात्र स्टार्कने अनुभवी सलामी फलंदाजाला शून्यावर माघारी धाडलं. त्यांनतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुभमन नाबाद 28 धावा व चेतेश्वर पुजारा नाबाद 7 धावा करून खेळत होते. शुभमनने पदार्पणाच्या सामन्यात जबरदस्त सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी तो आपली लय कायम ठेवत मोठी करण्याच्या प्रयत्नात असेल. पहिल्या दिवसाखेर भारत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातच्या एकूण 159 धावांनी पिछाडीवर आहे.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन
भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.