IND vs AUS 2nd Test Day 1 Live Streaming: अॅडिलेड ओव्हलमधील थरारक पहिल्या टेस्टनंतर ऑस्ट्रेलिया (Australia) आणि भारत (India) मेलबर्न (Melbourne) येथे आमने-सामने येण्यास सज्ज आहेत. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर परंपरेनुसार दुसरा बॉक्सिंग डे टेस्ट (Boxing Dat Test) मॅच खेळली जाईल. आणि पहिल्या टेस्ट मॅच प्रमाणेच यंदाचा सामना देखील मनोरंजक असेल अशी चाहत्यांच्या अपेक्षा आहेत. दरम्यान, हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5:00 वाजता सुरु होईल. भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्याचे लाइव्ह प्रक्षेपण भारतीय चाहत्यांसाठी सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. सोनी टेन 1 एचडी/एसडी आणि सोनी सिक्स एचडी/एसडी इंग्रजी कमेंट्री तर हिंदी कमेंट्री सोनी टेन 1 एचडी/एसडी वर उपलब्ध असेल. शिवाय Sony LIV अॅपवर चाहत्यानां लाईव्ह ऑनलाईन स्ट्रीमिंग पाहायला मिळेल. Jio आणि Airtel यूजर्स सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीवी आणि एयरटेल स्ट्रीमवर पाहू शकतात. (IND vs AUS 2nd Test 2020-21: टीम इंडिया 'या' 3 कारणांमुळे बॉक्सिंग डे टेस्ट जिंकण्याचा आहे दावेदार, वाचा सविस्तर)
सामन्यापूर्वी दोन्ही संघांनी आपले प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहेत. कांगारू संघाने पहिल्या सामन्यातील आपल्या विजयी संयोजनात कोणताही बदल केलेला नाही तर भारतीय इलेव्हनमध्ये चार बदल पाहायला मिळत आहे. अजिंक्य रहाणेवर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी असेल तर शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. शिवाय, रिद्धिमान साहाच्या जागी रिषभ पंतचा समावेश झाला आहे. पृथ्वी शॉ याला पहिल्या सामन्यातील अपयशामुळे बेंचवर बसवण्यात आले आहेत. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियासाठी जो बर्न्ससह पुन्हा एकदा डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीत मॅथ्यू वेड सलामीला मैदानात उतरेल.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन
भारत: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया: टिम पेन (कॅप्टन/विकेटकीपर), जो बर्न्स, मॅथ्यू वेड, स्टिव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, ट्रेव्हिस हेड, कॅमरून ग्रीन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन.