IND vs AUS 2nd Test Day 2: भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) तिसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला असून कांगारू संघाला पराभव टाळण्यासाठी 2 धावांची गरज आहे. अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने सामन्यावरील आपली पकड मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियाचे महत्त्वाचे फलंदाज या डावात लवकर बाद झाले. दुसऱ्या डावात यजमान संघाला नियमित अंतराने झटके लागत असल्याने संघाने तिसऱ्या दिवसाखेर 6 विकेट गमावून 133 धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाने 50 ओव्हरच्या आत 6 विकेट्स गमावल्यानंतर अष्टपैलू क्रिकेटपटू कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्सने आणखी पडझड होऊ दिली नाही. यासह त्यांनी 131 धावांची पिछाडी भरुन काढत ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेले, मात्र त्यांनी 6 विकेट देखील गमावल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात मॅथ्यू वेडने 40, मार्नस लाबूशेनने 28 तर ट्रेव्हिस हेडने 17 धावा केल्या. दुसरीकडे, सध्या ऑस्ट्रेलिया 2 धावांनी आघाडीवर आहे. रवींद्र जडेजाने 2 तर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली. (IND vs AUS 2nd Test 2020: अरेरे! जसप्रीत बुमराहने काही कळायच्या आतच उडवली स्टिव्ह स्मिथची दांडी, पाहून तुम्हीही म्हणाल, 'अरे वाह...' Watch Video)
दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताचा पहिला डाव 326 धावांवर संपुष्टात आला आणि याबरोबरच दौऱ्यावर असलेल्या संघाने 131 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी बरी झालेली नाही. जो बर्न्सला यादवने अवघ्या 4 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर माघारी धाडलं. यानंतर लाबूशेनने सलामीवीर मॅथ्यू वेडसह ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण नंबर-3 फलंदाज अश्विनच्या चेंडूवर 28 धावांवर रहाणेकडे झेलबाद होत पॅव्हिलियनमध्ये परतला. बुमराहने टाकलेल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर स्टिव्ह स्मिथ त्रिफळाचीत झाला. यावेळी, बुमराहने टाकलेल्या चेंडूने लेग स्टंपवरील बेल्सला स्पर्श केला, त्यामुळे ती बेल्स खाली पडली. पण स्मिथच्या मात्र बेल्स पडल्याचे लक्षातच आले नाहीआणि तो धाव घेण्यासाठी धावला. मात्र रिप्लेमध्ये अखेर स्मिथ त्रिफळाचीत झाला असल्याचे दिसल्याने अखेर त्याला बाद देण्यात आले.
त्यानंतर जडेजाने घातक टिकून फलंदाजी करणाऱ्या वेडला पायचीत करत पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. ट्रेव्हिस हेडला बाद करत सिराजने कांगारू संघाला पाचवा धक्का दिला. कर्णधार टिम पेन देखील 1 धाव करून परतला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने 99 धावांवर 6 विकेट गमावल्या. यापूर्वी, भारतीय गोलंदाजांनी कांगारू संघाचा पहिला डाव 195 धावांवर गुंडाळला. भारतासाठी पहिल्या डावात रहाणेने 112 तर जडेजाने 57 धावा केल्या.