जसप्रीत बुमराहने उडवली स्टिव्ह स्मिथची दांडी (Photo Credit: Twitter)

IND vs AUS 2nd Test 2020: भारताविरुद्ध (India) ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार आणि अनुभवी कसोटी फलंदाज स्टिव्ह स्मिथच्या (Steve Smith) अपयशाची मालिका यंदाही सुरूच राहिली. बॉक्सिंग डे टेस्टच्या (Boxing Day Test) तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात फलंदाजी करत जसप्रीत बुमराहने (Jasprit Burmah) सर्वांना चकित करत स्मिथची दांडी गुल केली. 32.2 ओव्हरमध्ये बुमराहच्या चेंडूवर स्मिथने कट मारण्याचा प्रयन्त केला, पण चेंडूत थेट विकेटकीपर रिषभ पंत याच्याकडे गेला जो त्याच्या हातून निसटला. बुमराहने अंपायरकडे एलबीडब्ल्यूसाठी अपील केली, इतक्यात कर्णधार अजिंक्य रहाणेने खेळपट्टीवर येत स्टंप्सकडे इशारा केला, तेव्हा बेल्स उडाल्या असल्याचे सर्वांच्या लक्षात आहे. स्मिथ देखील चकित होऊन खेळपट्टीवरच उभा राहिला. या दरम्यान, मैदानावरील पंचानी थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवल्यास रीप्लेमध्ये चेंडू स्मिथच्या लेग स्टंपच्या वरच्या बाजूला लागून गेल्याच दिसून आला. अशाप्रकारे स्मिथ पुन्हा एकदा मालिकेत एकेरी धावसंख्येवर माघारी परतला. (IND vs AUS 2nd Test 2020: टिम पेन नॉट आऊट पण रहाणे आऊट? अजिंक्यच्या विकेटवरून Netizens चा थर्ड अंपायर सायमन टॉफेलवर पक्षपातचा आरोप)

दरम्यान, स्मिथला काही कळायच्या आतच भारतीय खेळाडूंनी त्याची विकेट साजरी करण्यास सुरुवात केली हे पाहून जेव्हा स्मिथने मागे वळून पहिले तेव्हा त्याच्याही स्टंपवरील बेल्स पडल्याचे ध्यानी आले. दुसऱ्या डावात स्मिथची विकेट भारतासाठी महत्वावी ठरली. यंदाच्या मालिकेत कांगारू संघाच्या फलंदाजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात कर्णधार टिम पेनच्या नाबाद 73 धावांची खेळी वगळता अन्य फलंदाज अर्धशतकी धावसंख्या पार करू शकलेले नाही. मार्नस लाबूशेनने पहिल्या संयत 47 आणि दुसऱ्या बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्या डावात 48 धावा केल्या होत्या, मात्र तो देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. शिवाय, भारताविरुद्ध दुसऱ्या डावात हा लेख लिहीपर्यंत 92 धावांवर 3 विकेट गमावल्या आहेत. सलामी फलंदाज मॅथ्यू वेड अद्याप आपली विकेट सांभाळत भारतीय गोलंदाजांविरुद्ध संयमी फलंदाजी करत आहे. वेड नाबाद 40 धावा करून खेळत आहेत. पहा स्मिथच्या विकेटचा हा व्हिडिओ: 

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील 195 धावांच्या प्रत्युत्तरात भारताने प्रभारी अजिंक्य रहाणेचे शतक आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतच्या जोरावर 326 धावांपर्यंत मजल आली 131 धावांची आघाडी घेतली. रहाणेने 112 धावांची शतकी खेळी केली, तर जडेजाने 57 धावा केल्या. नवोदित शुभमन गिलने पदार्पणाच्या सामन्यात 45 धावा केल्या.